पुणे, दि. १२ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगर नियोजन
समितीच्या (पीएमआरडीए) बहुचर्चित निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सर्व १४ तसेच राष्ट्रवादीचे
सर्व ७ आणि शिवसेनेच्या एका उमेदवाराचा विजय झाला. तर नागरी गटातून काँग्रेसच्या एकमेव
उमेदवार चंदूशेठ कदम यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध न करता उमेदवार
उभा करणाऱ्या काँग्रेसला मोठा धक्का बसला असतानाच, राष्ट्रवादी मधून उभ्या असलेल्या
बहिण भावांची या महानगर नियोजन समितीच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे.
नगरविकास विभागाच्या सूचनेनुसार
पुणे महानगर नियोजन समितीवर थेट निवडणुकीद्वारे नामनिर्देशित होणाऱ्या 30 सदस्यांची
नेमणूक केली गेली. यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाने ठरवलेल्या संख्येनुसार महानगरपालिका
क्षेत्रातून 22, नगरपरिषद क्षेत्रातून
1 आणि ग्रामीण भागातून सात सदस्यांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार दिलीप
प्रभाकर बराटे हे वारजे मधील राष्ट्रवादीचे नगरसेवक महानगरपालिका क्षेत्रातून या
निवडणुकीला राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून उभे राहिले होते. तर त्याचवेळी ग्रामीण
भागातून दिलीप बराटे यांच्या भगिनी आणि कार्ला गावच्या सरपंच दिपाली दीपक हुलावळे
या देखील राष्ट्रवादीकडून या निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या होत्या. दोघांच्याही कामांची
पद्धत पाहता मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत, त्यांच्या बाजूने कौल दिला.
त्यामुळे पुढील काळात पीएमआरडीए समितीच्या ३० सदस्यांमध्ये या बहिण भावांचा आवाज
देखील घुमणार आहे.
या निवडणुकीत महानगरपालिकेतले
सर्व नगरसेवक, जिल्हा परिषदेचे
अध्यक्ष, पंचायत समित्यांचे सभापती आणि समाविष्ठ गावांच्या सरपंचांना
मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत मिळून 285 मतदार
होते. सोबतच नगर परिषदांमध्ये 114 तर ग्रामीण भागामध्ये 581 मतदार होते. पीएमआरडीएमध्ये
पुणे जिल्ह्याच्या वर्तुळाकार समाविष्ठ होणाऱ्या वेगवेगळ्या तालुक्यांतल्या गावांचा
समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पुणे शहरासह मावळ तालुक्यांतल्या 189, मुळशी 144, आणि हवेली तालुक्यातल्या सर्व 108,
गावांचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच खेड 114, शिरूर 68, भोर 53, वेल्हा 52,
दौंड 51 आणि पुरंदर तालुक्यातली 38 अशी एकूण 817 गावं पीएमआरडीएमध्ये
समाविष्ठ करण्यात आली आहेत.
मात्र या ३० पैकी सर्वाधिक २२ जण महापालिका क्षेत्रातून
असून, त्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांची मुदत पुढील ३ महिन्यांत संपत
असल्याने आताच्या नगरसेवकांचीही मुदतही फेब्रुवारी २०२२ मध्ये संपणार आहे.
त्यामुळे पीएमआरडीए सदस्य पदासाठी विजयी होणाऱ्या नगरसेवकांची मुदतसुध्दा आपोआप
सपुष्टात येईल. दरम्यान, समितीच्या यापूर्वीच्या
सदस्यांची सहा वर्षांत एकही बैठक झालेली नाही. पीएमआरडीए सदस्य असूनही त्याचा लाभ
कोणाला घेता आला नाही, अथवा निर्णय प्रक्रियेतसुध्दा सहभाग
घेता आलेला नाही. त्यामुळे आता विजयी होणाऱ्या सदस्यांना काम करण्याची संधी मिळणार
का याबाबात साशंकता आहे. त्यामुळे या ३० सदस्यांपैकी २२ सदस्य केवळ नामधारी
पीएमआरडीए सदस्य असण्याची शक्यता आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली
काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो
करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या
इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/
आमच्या ट्विटर’ची
लिंक : https://twitter.com/checkmate_times