पुणे,
दि.२५ (चेकमेट टाईम्स): कोरोना संकटाच्या काळात शिवणे-उत्तमनगर-कोंढवे -कोपरे या गावांमध्ये
सामाजिक बांधीलकी जपत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उत्तमनगरचे सरपंच सुभाष नाणेकर यांचा विशेष सन्मान
करण्यात आला.
राजभवनात
झालेल्या या सन्मान सोहळ्याला गोव्याचे स्वामी महामंडलेश्वर शिवानंद महाराज यांच्यासह
मान्यवर उपस्थित होते. सुभाष नाणेकर यांनी कोरोना काळात भाजीपाल्यापासून अन्नधान्य
किटचे तर वाटप केलेच, शिवाय रेशनिंगच्या धान्यावर अवलंबून असलेल्या खऱ्या गरजवंत
नागरिकांची दिवाळी गोड व्हावीच आणि कोरोनाच्या पुढील काळात देखील हातभार लागावा
म्हणून, सुभाष नाणेकर यांनी कोरोना असेपर्यंत दर महिन्याला जवळपास ५ ते ७ हजार
नागरिकांना गहू, तांदूळ आणि इतर जीवनावश्यक वस्तू देण्याची घोषणा नाणेकर यांनी
केली आहे.
या
पार्श्वभूमीवर सुभाष नाणेकर यांच्या सामाजिक बांधिलकीची नोंद महाराष्ट्राच्या राजभवनाने
घेत, त्यांना कोरोना योद्धा सन्मानाने पुरस्कृत केले आहे. पुण्यातील हाताच्या
बोटावर मोजण्याएवढ्याच सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान राजभवनात झाला असल्याने
नाणेकर यांच्या कार्याची उचित दखल घेतली गेली असल्याचे मत व्यक्त केले जाते आहे.
यावेळी राज्यपालांनी नाणेकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतानाच, “सामाजिक
बांधिलकी सोडू नका, प्रसंगी आपण तुमच्या सोबत आहोत”. असेही आश्वासन कोश्यारी यांनी
दिले असल्याचे नाणेकर यांनी सांगितले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली
काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो
करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या
इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/
आमच्या ट्विटर’ची
लिंक : https://twitter.com/checkmate_times