पुणे, दि.२७ (चेकमेट
टाईम्स): दोन दिवसांपूर्वीच वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली एक खुनाची घटना,
त्यानंतर उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत दोन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह एकाजनाची
अटक ताजी असतानाच, वारजे मध्ये एकाच रात्री अवघ्या काही तासांच्या अंतराने
झालेल्या दोन हाफ मर्डरच्या घटनांनी वारजे हादरले आहे. त्यातील एका घटनेत एकावर
गोळीबार करण्यात आलेला असून, त्याच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार
चालू आहेत. तर कोयत्याने हल्ला झालेल्या दुसऱ्याला उपचार करून सोडून देण्यात आले
आहे.
याबाबत पोलीस
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि.२७ नोव्हेंबर २०२१ रात्री साडेआठच्या
सुमारास, वारजे माळवाडी मधील गोकुळनगर पठारावर जुन्या भांडणाचा राग मनात धरून
एकावर तीन ते चार जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केला. यात सुनील शंकर कदम (वय.३६
रा. गोकुळनगर पठार, वारजे माळवाडी, पुणे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत तीन ते चार हल्लेखोरांवर वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. सुनील कदम यांच्यावर उपचार करून सोडून देण्यात आले आहे.
वारजे मध्ये १० दिवसात २ खून; अज्ञात तरुण महिला, पुरुषाच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न?
तर दुसऱ्या घटनेत
शुक्रवार दि.२७ नोव्हेंबर २०२१ च्या मध्यरात्री अडीचच्या सुमारास, वारजे हायवे
चौकात, कात्रजच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्त्यावर तेथेच राहणारे अमर रमेश चव्हाण (वय.३४
रा.वारजे हायवे चौक, जुनी नारळी बाग, पुणे) याच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार
केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये अमर चव्हाण याच्या पोटात गोळी लागली असून,
त्याच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. चव्हाण याच्यावर
कोणी आणि का हल्ला केला याचा तपास चालू आहे.
या एकामागे एक
घडलेल्या दोन घटनानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वारजे मध्ये धाव घेत घटनास्थळाला
भेटी दिल्या आहेत. त्यात प्रामुख्याने अपर पोलीस आयुक्त
पश्चिम विभाग राजेंद्र डहाळे, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ ३, सहायक
पोलीस आयुक्त गजानन टोंपे, गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय
महाजन यांच्यासह, वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस
निरीक्षक शंकर खटके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमृत मराठे यांच्यासह पोलीस
दलाच्या विविध चिकित्सा विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घात्नास्थालाची पाहणी
केली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली
काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो
करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या
इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/
आमच्या ट्विटर’ची
लिंक : https://twitter.com/checkmate_times