पुणे, दि.२७ (चेकमेट टाईम्स): एमआयटी
वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतील मॅकॅनिकल इंजिनियरिंगच्या तिसर्या वर्षातील ज्या विद्यार्थ्यांना
कोरोनाची लागण झालेली आहे. त्यातील सर्वंच विद्यार्थ्यांनी लसीच्या दोन्ही डोस घेतलेले
आहेत. त्या संदर्भातील प्रमाणपत्र ही विद्यापीठाच्या प्रशासनाकडे उपलब्ध आहे. त्याप्रमाणे
आम्ही वर्गात त्याच विद्यार्थ्यांना प्रवेश देतो ज्यांच्याकडे दोन्ही डोसचे प्रमाणपत्र
उपलब्ध आहे.” अशी माहिती युनिव्हर्सिटीचे कुलसचिव प्रा.डॉ. प्रशांत
दवे यांनी दिली आहे.
विद्यापीठ
अनुदान आयोग व राज्य शासनाने दिलेले निर्देशानुसार शैक्षणिक संस्थाकडून कोरोना प्रतिबंधंक
लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयामध्ये ऑफलाईन वर्गासाठी प्रवेश
दिला जात आहे. एमआयटीमधील सर्व विद्यार्थ्यांना कोरोनाविषयक नियमांचे पालन करूनच प्रवेश
देण्यात येतो. ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, ते सर्व विद्यार्थी राष्ट्रीय
स्तरावरील सुप्रा स्पर्धेची तयारी करीत होते. त्यांना विद्यापीठाच्या वर्कशॉप मध्ये
स्पर्धेच्या तयारीसाठी प्रवेश दिला होता. ते वर्कशॉपच्या एका कोपर्यात तयारी करीत
होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा इतरांशी संपर्क आलेला नसल्याचेही
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
तसेच, कोरोनाबाधित विद्यार्थ्याच्या
संपर्कात आलेल्या २५ विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यातील १३ विद्यार्थ्यांना
कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून, ८ विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आलेली
आहे. सद्यस्थितीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण
नाही. यातील काही विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
अद्याप एकही विद्यार्थी ओमायक्रॉनबाधित असल्याचे आढळून आलेले नाही, असेही या
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही लसी घेऊनही जर कोरोनाची लागण होतच
असेल तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भिती
पालकांमधून व्यक्त केली जाते आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली
काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो
करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या
इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/
आमच्या ट्विटर’ची
लिंक : https://twitter.com/checkmate_times