पुणे, दि.30 (चेकमेट टाईम्स): उद्योजक उद्योजिकांच्या प्लॅटफॉर्म वर सुपर पॉवर अलायन्सच्या (Super Power Alliance) पुणे विभागीय कार्यकारी संचालक (Executive Director of Pune Region) कोंढवे धावडे (Kondhave Dhawade Pune) येथील गणेश राऊत (Ganesh Raut) यांची नुकतीच निवड
करण्यात आली. मुंबई येथे कंपनीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष नावेद शेख (Naved Shaikh) यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह
आणि नियुक्ती पत्र देऊन राऊत यांची एकमुखाने नियुक्ती करण्यात आली.
हे सर्व फक्त पुणे प्रेसिडेंट (Pune President Super Power Alliance) सुर्यकांत सकपाळ (Suryakant Sapkal)यांच्या मुळे शक्य झाले. त्यांनी ठेवलेला विश्वास आज सार्थ ठरला. जर आपलं ध्येय, उद्दिष्ट आणि कार्य हे निःस्वार्थ असेल, तसेच जिद्द ही फक्त जिंकणं नाही तर हारूनही आपण जिंकू शकतो अश्या विचारांची असेल, तर या जगात अशक्य असे काहीच नाही, असे मत गणेश राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.
कोरोना
महामारीमुळे सर्वच व्यसायिक हतबल झाले असताना, सुपर पॉवर अल्लाएन्स ही संस्था सगळ्या
उद्योजक उद्योजिकांना एकत्र आणत, त्यांना रेफरेल बिजनेस देऊन त्यांचं स्वतंत्र, स्वतःच
अस्तित्व निर्माण करत तर आहे. त्याच बरोबर सर्वाना एकत्र करून एक मोठं उद्योजकांच पर्व
निर्माण करत आहे, असे सुर्यकांत सकपाळ यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाला लुनेश्वर
भालेराव (Luneshwar Bhalerao), राहुल
पडवळ (Rahul Padwal), ऋषीकेश जाधव (Hrishikesh Jadhav), मोजम शेख (Mojam Shaikh), प्रशांत मस्के (Prashant Mhaske), अमीन आगा (Amin Aaga) यांच्यासह अनेक उद्योजकांची
प्रमुख उपस्थिती लाभली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली
काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो
करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/
आमच्या ट्विटर’ची
लिंक : https://twitter.com/checkmate_times