Type Here to Get Search Results !

भांडी घासण्याचे काम ते ३ शहरात मिळून हॉटेलच्या १५ शाखा ७५ कोटींचा टर्नओव्हर; ही जबरदस्त गोष्ट ठरेल यशाची गुरुकिल्ली


 

पुणे, दि.१8 (चेकमेट टाईम्स): मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे असं आपण नेहमीच म्हणतो. इथे रोज हजारो लोक यशस्वी होण्याचं स्वप्न आपल्यासोबत घेऊन येतात. काही लोक नोकरी करून आपलं करिअर घडवतात, तर काही लोक व्यवसाय करून आपली स्वप्नपूर्ती करतात. मेहनत करायची तयारी असेल तर, मुंबई कोणालाच नाराज करत नाही हे एक सत्य आहे. कर्नाटक मधून मुंबईत येऊन शिव सागर रेस्टॉरंटही हॉटेलचेन सुरू करणाऱ्या नारायण पुजारीया व्यक्तीची माहिती पाहिल्यावर हे पुन्हा एकदा सिद्ध होतं. पाहूयात आमच्या या चांगलं चुंगल विशेष मध्ये तुम्हाला हॉटेल व्यवसायात कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्यासाठी प्रवृत्त करणारी ही विशेष स्टोरी

 

नारायण पुजारी यांचा जन्म १९६७ मध्ये कर्नाटकच्या उडपी जिल्ह्यातील गुज्जडी या छोट्या गावात झाला. घरची परिस्थिती जेमतेम होती. वयाच्या १३व्या वर्षी नारायण पुजारी हे काही तर चांगलं काम करायचंया हेतूने मुंबईत आले. दिवसा हॉटेलमध्ये भांडी घासण्याचे काम करायचे आणि रात्री शाळा अटेंड करायचे. १९८० च्या दशकात मुंबई मध्ये खूप नवीन उद्योग आणि ऑफिसेस सुरू झाले होते. देशभरातून खूप तरुण मुलं मुंबईत कामासाठी रोज दाखल होत होते. मुंबई शहर हे कसं घड्याळाच्या सेकंद काट्यांवर चालतं हे आपण सगळे जाणतोच. त्या काळी फास्ट फूडजसे की, पाव भाजी, डोसा हे पदार्थ काम करणाऱ्या तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होत होते. नारायण पुजारी यांनी एक मार्केट रिसर्च केला आणि त्यांच्या लक्षात आलं, की आपण या फास्ट फूडचं हॉटेल सुरू केलं तर ते नक्की चालू शकतं.

 

हे हॉटेल सुरू करण्यासाठी नारायण पुजारी यांनी एका पार्टनरला सोबत घेऊन इन्व्हेस्टमेंट केली. मात्र एका वर्षातच पार्टनरने काही कारणांमुळे काढता पाय घेतला आणि मग नारायण पुजारी हे शिव सागरहॉटेल चेनचे मालक झाले. आज या चेन चा टर्नओवर हा ७५ करोड वर पोहोचला आहे आणि ३ शहरात मिळून १५ शाखा स्थापन झाल्या आहेत.

 

एका मुलाखतीत बोलताना नारायण पुजारी यांनी सांगितलं होतं, की तो काळ वेगळा होता. तेव्हा आजच्या इतकी स्पर्धा नव्हती, पण ग्राहकांना आपल्यापर्यंत आणणं हे एक आव्हान होतं. आम्ही सतत नवीन प्रयोग करत राहिलो. जे पदार्थ बाकी कोणी ठेवत नाहीत ते आम्ही ठेवू लागलो. जसं की, डोसा आणि त्याचे विविध प्रकार आणि इंडियन पिझ्झाजे की आमच्या ग्राहकांच्या पसंतीस पडले.

 

वेगळं काय केलं?

इतर उडपी हॉटेल हे संध्याकाळी ७ किंवा ८ वाजता बंद व्हायचे. त्याच वेळी शिव सागरहे रात्री २ वाजेपर्यंत चालू असायचे. त्यांच्या या स्पेशलिटीमुळे फार कमी काळात शिव सागरहे तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झालं. आज सोशल मीडिया आणि स्वस्त इंटरनेट मुळे लोकांपर्यंत पोहोचणं हे अगदी सोपं झालं आहे. ९० च्या दशकात हे इतकं सोपं नव्हतं. तेव्हा लोक सिनेमा थिएटर मध्ये बघण्यासाठी कायम उत्सुक असत. लोकांची ही आवड नारायण पुजारी यांनी हेरली आणि त्यांनी दक्षिण मुंबईतील काही टॉकीज मध्ये जाहिराती द्यायला सुरुवात केली.

जवळपास १ लाख रुपयांचा बिजनेस नारायण पुजारी यांना या माध्यमातून मिळाला. आणखीन एक महत्वाचे म्हणजे नारायण पुजारी यांनी आपल्या हॉटेल मध्ये स्टील प्लेट्सचा वापर बंद केला आणि अमेरिकेहून काही Corelle प्रकारातील प्लेट्स मागवल्या आणि त्या काळात लोक त्या गोष्टीचं सुद्धा कौतुक करणारे होते. त्यामुळे आणखीन ग्राहक आकर्षित झाले. म्हणजेच प्रेझेन्टेशन हे देखील तितकेच महत्वाचे होते, सध्याही आहे आणि राहील हे व्यवसायात यशस्वी होऊ इच्छिणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

 

दुसरी पिढी

२०१७ मध्ये नारायण पुजारी यांची मुलगी निकिता पुजारी हिने बीटेकचं शिक्षण पूर्ण करून या बिजनेस मध्ये वडिलांची साथ द्यायला सुरुवात केली. तिच्या बिजनेस मध्ये येण्याने शिव सागरच्या प्रगतीला एक दिशा मिळाली. त्यांनी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये “फिश एन बाईट” या नावाचं एक सीफूड रेस्टॉरेंट सुरू केलं. त्यामध्ये अपेक्षित यश न मिळल्याने ते २०१८ मध्ये बंद करावं लागलं. तेव्हा नारायण पुजारी यांच्या लक्षात आलं, की,फक्त जेवणाची सोय असलेलं हॉटेल आणि जेवण-बार ची सोय असलेल्या हॉटेलपैकी लोक दुसऱ्या प्रकाराला जास्त पसंती देतात. त्यांनी याच फॉर्म्युलाला घेऊन बटरफ्लाय हायया नावाने नवीन हॉटेल्स सुरू केल्या. या प्रकाराला लोकांनी भरभरून दाद दिली.

 

निकिता पुजारी यांनी द बिग स्मॉल कॅफे बारची सुरुवात केली. हॉटेलच्या या प्रकाराची सुरुवात त्यांनी पुणे, मँगलोर सारख्या शहरांच्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून केली आहे. आपल्या हॉटेलची प्रत्येक शाखा ही स्वच्छ असावी हा नारायण पुजारी यांचा आग्रह असतो. ते अचानक त्यांच्या कोणत्याही हॉटेलला भेट देतात आणि ते आधी टॉयलेट स्वच्छ आहे की नाही ते बघतात आणि मग किचन. कारण, कस्टमर हे तुम्हाला या छोट्या गोष्टींवरून जज करत असतात आणि रेटिंग देत असतात, याची पूर्ण कल्पना नारायण पुजारी यांना आहे.

 

अन्न आणि स्वच्छतेचा दर्जा टिकवण्यासाठी नारायण पुजारी यांनी कॉर्पोरेट मध्ये काम केलेले शेफसुद्धा ठेवले आहेत. कोणतीही नवीन व्यक्ती ग्रुप मध्ये जॉईन झाल्यावर त्याला आधी प्रॉपर ट्रेनिंग देऊन मगच काम देण्यात येतं. अगदी खाजगी नोकरी सारखं.

 

नारायण पुजारी यांच्यामुळे आज १३०० लोकांना नोकरी मिळाली आहे याचं पुजारी कुटुंबाला खूप समाधान आहे. अमिताभ बच्चनयांचे मोठे चाहते असलेले नारायण पुजारी हे आज आपली स्वप्नपूर्ती झाली असल्याचं आपल्या मुलाखतीतून अभिमानाने आणि कृतज्ञतेने नेहमीच सांगतात. तेव्हा जर आपल्यालाही नारायण पुजारी यांच्यासारख यशस्वी व्हायचं असेल तर अगोदर त्यांच्या यशामागची गुपित लक्षात घेतली पाहिजेत, नव्हे तर ती आत्मसात करून त्यात आपल्याही बुद्धी कौशल्याची भर टाकून जास्तीत जास्त यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमची त्या कामाप्रती एकनिष्ठता असली पाहिजे. चला तर मग चांगलं चुंगल कडून तुम्हाला हॉटेल व्यवसायातील यशासाठी चांगल्या चांगल्या शुभेच्छा...

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

 

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.