Type Here to Get Search Results !

शहराचे वाटोळे करण्यात पालिका अधिकारी आणि एल अँड टी मध्ये साटेलोटे आहे काय; दिपाली धुमाळ यांचा संतप्त सवाल

 

पुणे, दि.२१ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरामध्ये २४ X 7  या पाणी पुरवठा योजने अंतर्गत एल ॲन्ड टी’च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याचे लाईनचे काम सुरू आहे. त्यासाठी शहरभर मोठ्या प्रमाणात खोडी सुरु आहे. या कामांमध्ये महापालिकेचे  संबंधित अधिकारी कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नाहीत. शहरातील चांगले चांगले रस्ते त्या ठिकाणी खोदले जातात. या मध्ये पिण्याच्या पाण्याची लाईन, पावसाळी लाईट, ड्रेनजच्या लाईने तोडफोड केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पुरवठा त्या ठिकाणी होत आहे.

 

अशाप्रकारचे वारजे भागामध्ये एल अँड टी च्या माध्यमातून पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. संबंधित अधिकारी व एल अँड टी च्या अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे महापालिकेचे संबंधित अधिकारी व एल अँड टी चे कर्मचारी यांच्यामध्ये काय साटेलोटे असल्याचे नागरिकांमध्ये संशय निर्माण होत असल्याचा संतप्त सवाल पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे.

 

वारजे भागामध्ये अनेक ठिकाणी जुन्या पाईपलाइनची तोडफोड करुन दूषित पाणीपुरवठा नागरिकांना होत आहे. हा पाणीपुरवठा लाईन फुटल्यानंतर त्वरित याची दुरुस्ती केली जात नाही. दोन ते चार दिवस पिण्याचे पाणी दूषित होऊन नागरिकांना पुरवठा होत आहे. वारंवार तक्रार करून सुद्धा त्याची दुरुस्ती होत नाही व याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे.

 

तर या खोदाई आणि खोदाई मुळे होत असलेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर एल अँड टी चे अधिकारी व महापालिकेचे संबंधित कर्मचारी आणि  ठेकेदार यांच्यावर पोलीस कारवाई व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी दिपाली धुमाळ यांनी केली असून, अन्यथा नागरिकांसह पालिका आणि एल अँड टी विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देखील धुमाळ यांनी दिलाय. त्याचबरोबर एल अँड टी अधिकारी आणि संबंधित महापालिका कर्मचारी अधिकारी यांच्या विरोधात स्थानिक पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचा इशारा देखील दिपाली धुमाळ यांनी एका पत्राद्वारे महानगरपालिका आयुक्तांना दिला आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

 

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.