पुणे,
दि.२० (चेकमेट टाईम्स): ज्यांच्या नावाने खरं तर स्वच्छता अभियान सुरु झाले अशा संतश्रेष्ठ
गाडगेबाबा पुण्यतीथी (Gadge Baba Punyatithi) निमित्त शिवणे उत्तमनगर (Shivane Uttam Nagar) परिसरात स्वच्छता अभियान (Swachhata Abhiyan) राबवण्यात
आले. हे स्वच्छता अभियान राबवत असताना फक्त कचरा गोळा करून घेणे असे न करता, त्या
ठिकाणी सुंदर रांगोळ्या काढून स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या गाडगेबाबांना अनोख्या
पद्धतीने आदरांजली वाहण्यात आली (Tribute to Gadage Maharaj). त्यामुळे शिवणे उत्तमनगर भागात दिवसभर प्रसन्न
वातावरण अनुभवायला मिळाले.
उमेश कोकरे
मित्र परिवार (Umesh Kokare Friends Circle), सह्याद्री सम्राट सामाजिक संघटना (Sahyadri Samrat Samajik Sanghatana), किलबिल प्रतिष्टान (KilBil Pratishthan) आणि एनडीए रोड व्यापारी संघटना (NDA Road Business Association) यांच्या सहभागातून, पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे स्वच्छता अभियान
राबविण्यात आले. यानिमित्ताने नागरिकांनी कचरा उघड्यावर टाकू नये, यासाठी जनजागृती
करण्यात आली.
यावेळी सह्याद्री
सम्राट सामाजीक संघटनेचे मलिक शेख, बाबा शेख, उषा शिंदे, फरीदा ईनामदार, सारिका भोसले,
मंगल जाधव, एनडीए रोड व्यापारी संघटनेचे सिद्धार्थ शहाबादी, राहुल येलगुंडे व दिनेश कारळे, किलबिल प्रतिष्ठाणचे हर्षल पटवारी, ज्ञानदेव इंगळे, महापालिका अधिकारी सचिन सावंत, किरण
जाधव, दत्तात्रय दळवी व मुकादम व स्वछता सेवक, उत्तमनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह विजय भोसले, अतिष स्वामी, अमन खान, योगेश गुंड, शुभम आटवळे, रोहन शिंदे, सौरभ
चव्हाण, बबन तनपुरे, फ़ैजण सिद्दकी, सुरेश वाघे व मित्र परिवार उपस्थित होता. राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहर युवक अध्यक्ष उमेश कोकरे यांनी उपक्रमाचे आयोजन केले होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली
काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या
इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/
आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times