पुणे, दि.२९ (चेकमेट टाईम्स): वारजे
माळवाडी मधील प्रसिद्ध एलआयसी सल्लागार विशाल पाटील (LIC Consultant Vishal Patil) यांची एलआयसी तर्फे MDRT
(USA) या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी (Respected Award) निवड झाली आहे. या पुरस्कारामुळे
अमेरिकेतील बोस्टन (USA Boston Insurance Adviser Meet) मध्ये होणाऱ्या संमेलनासाठी विशाल पाटील यांची निवड झाली आहे.
एलआयसी’चा हा एक टॉपर पुरस्कार असून, पाटील यांना आतापर्यंत मिळालेल्या सर्व
पुरस्कारांमध्ये हा शिरपेचाचा तुरा आहे.
अबोल पण
संधी मिळताच धबधब्यासारखा कोसळणारा, मिळेल त्या कामाची मुद्देसुद, आखिव-रेखिव बांधणी करणारा, सर्वांना हव-हवासा वाटणारा
मनमिळावू व्यक्ती म्हणून विशाल पाटील यांची वारजे माळवाडी पंचक्रोशीत ओळख आहे.
विशाल पाटील यांच्याकडे पॉलिसी घेतलेली नसली तरी गरजवंतांना पॉलिसीच्या रकमा
मिळवून देण्यात पाटील अग्रेसर असतात. त्यामुळे त्यांच्याकडे पॉलिसी घेतलेल्यांना
तर अविश्वसनीय अशी सेवा (Unbelivable Service) मिळते याबाबत कोणाची शंका नाही.
या
पुरस्काराबाबत विशाल पाटील यांना विचारले असता, त्यांनी विनम्रपणे हा पुरस्कार
आपला नसून, आपल्याला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करणारे आपले गुरु SBA विकास अधिकारी किरण होळकर (Kiran Holkar) यांची कठोर तपश्चर्या आणि कोथरूड 95 के शाखेतील वरिष्ठ शाखाधिकारी गिरिश किंजवडेकर (Girish Kinjawadekar),
मिनाज शेख (Minaj Shaikh) यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळेच आज आपल्याला हा पुरस्कार आणि वारजे
माळवाडी (Warje Malwadi) मधील एका होतकरू तरुणाला सर्वात मानाच्या अमेरिकेतील विमा सल्लागार
संमेलनाला जायची संधी मिळाली असल्याचे विशाल पाटील (Vishal Patil) आवर्जून सांगतात.
त्याचबरोबर
आपल्यावर विश्वास दाखवून पॉलिसी घेणाऱ्यांच्या विश्वासाला आपण कधीही तडा जाऊ देणार
नाही. त्यांच्यासाठी एलआयसी’च्या ब्रीदवाक्याप्रमाणे “जिंदगी के साथ भी आणि जिंदगी
के बाद भी” (Jindagi Ke Saath Bhi, Jindagi Ke Baad Bhi) विशाल पाटील अहोरात्र काम करत राहील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त
केलाय.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली
काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो
करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/
आमच्या ट्विटर’ची
लिंक : https://twitter.com/checkmate_times