Type Here to Get Search Results !

वारजे मधील महिलेच्या गळ्याला कर्वेनगर मध्ये झटका; वारजे पोलिसात गुन्हा दाखल

 

पुणे, दि.२४ (चेकमेट टाईम्स): कर्वेनगर मधील विठ्ठल मंदिराजवळ (Karvenagar Vitthal Mandir), आनंद कॉलनी (Anand Colony) मध्ये राहणाऱ्या ५० वर्षीय महिलेच्या गळ्याला अज्ञातांनी दिलेल्या झटक्यामध्ये (Chain Snatching) त्यांना तब्बल ४० हजारांचा भुर्दंड पडला आहे. याबाबत त्यांनी वारजे पोलिसात (Warje Police Station) तक्रार दिली असून, वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जवळगी (PSI Chandrakant Jawalagi) तपास करत आहेत. मात्र भर दिवसा घडलेल्या या घटनेने कर्वेनगर भागात खळबळ उडाली आहे.

 

सदरील ५० वर्षीय महिला रविवार दि.२३ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ४ वाजून ३० मिनिटांच्या जवळपास राजाराम पुलाजवळील विठ्ठल मंदिराजवळ (Rajaram Bridge Vitthal Mandir) असलेल्या भाजी मंडई मधून त्यांच्या राहत्या घराकडे चालल्या होत्या. यावेळी खात्री बंधू आईस्क्रीम पार्लर (Khatri Bandhu Ice Cream) समोर भालचंद्र दवे चौकात (Bhalchandra Dave Chauk) दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी (Biker Thiefs) या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून  (gold Chain Snatching) पोबारा केला. सदरील महिलेने आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत दुचाकीस्वार भरधाव वेगात पसार झाले होते.

 

यानंतर वारजे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage of Chain Snatching) आणि इतर माध्यमातून तपास सुरु केला असून, भर दुपारी घडलेल्या या घटनेने कर्वेनगर मध्ये खळबळ उडाली आहे. एकूणच अशा वाढत्या घटना पाहता नागरिकांनी मौल्यवान वस्तू बाळगताना काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जाते आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

 

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.