पुणे, दि.५ (चेकमेट टाईम्स): कोरोना
रुग्ण वाढीचा टक्का वाढल्यानंतर कोरोना विषाणूची तिसरी लाट (3rd wave of covid 19) येण्याची शक्यता गृहीत धरून,
वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या (Warje Karvenagar Ward Office Area) हद्दीतील काही सोसायट्यांमध्ये कोरोना विषाणू (Corona Virus Viral i Societies) संसर्ग वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर, पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation Health Department) वतीने, वारजे कर्वेनगर
क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील चार सोसायट्यांना सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zone) म्हणून घोषित
करण्यात आलेले आहे.
त्यामध्ये
प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 31 कर्वेनगर (Karvenagar) मधील मनमोहन सोसायटी (Manmohan Society) मध्ये असलेली एक
अपार्टमेंट आणि प्रभाग क्रमांक 13 एरंडवणे (Erandwane) मधील प्रभात रोड (Prabhat Road) भागातील १, कर्वेनगरच्या
सहवास सोसायटी (Sahawas Society Karvenagar) मधील १ आणि कर्वे रस्त्यावरील (karve Road) एका मुख्य चौकाच्या नावाने ओळखली
जाणारी १ अशा चार सोसायट्यांना सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले
आहे.
या सोसायट्या
आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी विशेषता काही सूचनांचं पालन
करण्याचा गरजेचं असल्याचं क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे. त्यामध्ये
विशेषता इतर नागरिकांनी त्यांच्या आवारात अथवा घरी भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे
पल्स ऑक्सीमीटर आणि थर्मल डिटेक्टरच्या साह्याने तपासणी करावी. ज्या व्यक्तीची ‘ओ २’
सॅच्युरेशन लेव्हल ही 94 च्या खाली असेल त्यास त्वरित पुढील तपासणीसाठी पुणे महानगरपालिकेची
रुग्णालये अथवा खाजगी डॉक्टर यांच्यामार्फत तपासणी करून घेण्याबाबत सूचना देण्यात आलेले
आहे. त्याचबरोबर या ठिकाणी राहणारे ज्येष्ठ व्यक्ती, १० वर्षाखालील मुले, आजाराने ग्रस्त
असलेल्या व्यक्ती यांची पल्स ऑक्सीमीटरद्वारे तपासणी करून दैनंदिन नोंद ठेवण्यात यावी
अशा सूचना देखील पुणे महानगरपालिकेच्या वतीने सोमवार दि.३ जानेवारी २०२२ रोजी एका
परिपत्रकाद्वारे करण्यात आलेल्या आहेत.
सद्यस्थितीला
वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत ८९ कोरोना पॉजीटीव्ह रुग्ण आहेत. (Positive Patients in Warje Karvenagar Ward Office Area)नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता
घेण्याचे आवाहन करण्यात येत असून, शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या
सूचनांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्यांवर कडक दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई
करण्याची तरतूद ठेवण्यात आलेली असल्याचे कळवण्यात आले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली
काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो
करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या
इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/
आमच्या ट्विटर’ची
लिंक : https://twitter.com/checkmate_times