Type Here to Get Search Results !

मार्च मध्ये होणार अंतिम प्रभाग रचना जाहीर; शंभर टक्के सत्य होणार सूत्रांचे हे भाकीत?

 

पुणे , दि.२९ जानेवारी २०२२ (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्रातील दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांचे (Municipal Election) बिगुल वाजले असून, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा पुणे (Pune Municipal Corporation Election) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation Election) प्रभाग रचनाकडे (Prabhag Rachana) विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांचे डोळे लागलेले आहेत. त्याचवेळी मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात प्रभाग रचना  (Final Prabhag Rachana) बाबतची अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.

 

यातील पहिल्या टप्प्यात मंगळवार दिनांक १ फेब्रुवारी २०२२ रोजी निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे व त्यास प्रसिद्ध देणे अर्थात या दिवशी प्रभाग रचना जाहीर होणार आहे. त्याच दिवशी पासून अर्थात मंगळवार दिनांक १ फेब्रुवारी २०२२ पासून सोमवार दिनांक 14 फेब्रुवारी २०२२ अर्थात ५ राज्यांच्या निवडणुका जाहीर केलेल्या त्या दिवशी पर्यंत, या प्रभागांच्या प्रारूप अधी सूचनेवर हरकती आणि सूचना (Objections and Suggestions on Prabhag Rachana) मागविण्यात आलेल्या असणार आहेत.

 

तर बुधवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. त्यानंतर शनिवार दिनांक 26 फेब्रुवारी 2022 पर्यंत राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commision) प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हरकती आणि सूचनांवर सुनावणी देण्याची मुदत देण्यात आलेली आहे.

 

तर या सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारसी विहित नमुन्यात नमूद करून, विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास पाठविण्याची मुदत बुधवार दिनांक २ मार्च २०२२ देण्यात आलेली आहे. एकूणच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग रचनेवर अंतिम शिक्कामोर्तब होऊन प्रभाग रचना आणि त्यानंतर आरक्षणे जाहीर होतील.

 

दरम्यान पुणे महानगरपालिकेचे माजी विरोधीपक्ष (Former Opposition Leader of Pune Municipal Corporation) नेते उज्ज्वल केसकर (ujwal Keskar) आणि सुहास कुलकर्णी (Suhas Kulkarni) यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना एका पत्राद्वारे विनंती करताना, एससी व एसटी साठीचे (SC and ST Reservation) प्रभाग प्रारूप प्रभाग रचना जाहीर करतानाच जाहीर करण्याची मागणी केली आहे. यात एससी आणि एसटी प्रवर्गासाठी आरक्षणाचे निकष हे लोकसंख्येच्या आधारावर आहेत. सीमारेषा निश्चित करताना त्यामध्ये असणारे जनगणनेचे प्रगणक त्यातील एससी-एसटीच्या निवडणूक आयोगाकडे उपलब्ध असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर एससी आणि एसटी’साठी कुठले प्रभाग असतील हे देखील जाहीर करणे आवश्यक असल्याचे केसकर यांनी म्हटले आहे. तर महिलांचे आरक्षण इतर कार्यक्रमाप्रमाणे जाहीर करण्याबाबत कोणतीही हरकत नसल्याचे केसकर यांनी पत्रात म्हटले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

 

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.