पुणे, दि.२२ (चेकमेट टाईम्स):
ती पुण्यात आली, आपल्या नातेवाईकांकडे राहिली, मात्र ती कशी वाट चुकली? का तिला
नातेवाईकांनीच रस्त्यावर सोडले हे तिला सांगता येत नाहीये. वृद्धापकाळामुळे
अस्पष्टपणे भोजपुरी भाषेत बोलणारी ही ७० वर्षीय ज्येष्ठ महिला बिबवेवाडी पोलीस
स्टेशन हद्दीत मिळून आली आहे. तिला एवढ्या कडाक्याच्या थंडीत आसरा नसल्याने
सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या वारजे मधील शांतिबन केअर सेंटरच्या संचालिका
अनिता देवकर यांनी त्या ज्येष्ठ महिलेला आसरा दिला आहे.
बिहार मधील
कोणतेतरी गावाचे नाव सांगणाऱ्या सदर ज्येष्ठ महिला आपले नाव सुवतोदेवी किशन सांगत
असून, तिचे अंदाजे वय 70 वर्ष आहे. गोरा वर्ण, पाच फूट उंची आणि सडपातळ बांधा
असलेली ही महिला नातेवाईकाचे नाव पत्ता सांगण्यास असमर्थ असून, बुधवार दि. 19
जानेवारी 2022 रोजी रात्रीचे 12 वाजलेले असताना मिळाली आहे. वरील छायाचित्रातील महिलेच्या
नातेवाईकांनी शांतीबन केअर सेंटरशी 9130822812, 9403229948 या क्रमांकावर संपर्क साधावा
असे आवाहन करण्यात आले आहे.
अनिता
देवकर यांची शांतिबन केअर सेंटर नावाने वारजे, नांदेड सिटी आणि सिंहगड पायथ्याला
वृद्धाश्रम असून, तेथे गरजवंत वृद्धांना घरच्या सारखा आसरा दिला जातो. त्याचबरोबर
आजारी ज्येष्ठांची देखभाल करणे, त्यांची सेवा सुश्रुषा करणे, अशा सेवा दिल्या
जातात. वरील छायाचित्रात दिसत असलेल्या महिलेच्या कुटुंबियांची माहिती मिळाल्यास
वरील क्रमांकावर संपर्क साधू शकता. त्यांच्या नातेवाईकांपर्यंत ही माहिती
पोचण्यासाठी माहिती जास्तीत जास्त शेअर करा.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली
काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या
इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/
आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times