Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादीने स्वप्नील दुधाने यांना या विषयात समन्वयक पदाची दिली जबाबदारी



पुणे, दि.२० (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचे (Pune Municipal Corporation Election) बिगुल वाजेल आहे. नुकताच नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता कधीही महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता लक्षात घेता, राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपली संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यास सुरुवात केली असून, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अर्बन सेलची  (Nationalist Congress Party Urban Cell)बैठक खासदार आणि राष्ट्रवादी अर्बन सेलच्या प्रदेश अध्यक्ष वंदना चव्हाण (MP Vandana Chavan), अर्बन सेलचे शहराध्यक्ष नितीन कदम (Nitin Kadam), शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे पुणे शहर उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने (NCP Dy President Swapnil Dudhane)यांची शहर सुधार व महापालिका समन्वय या समितीच्या समन्वयक (Co-ordinator of the Committee on City Improvement and Municipal Co-ordination) पदी निवड करण्यात आली.

 

अर्बन सेलच्या समन्वयातून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट काम करण्याचा संदेश यावेळी खा. वंदना चव्हाण, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला. यावेळी महिला शहर अध्यक्ष मृणालिनी वाणी (NCP Womens President Mrunalini Wani), युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे (NCP Youth President Kishor Kamble) आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

याबाबत बोलताना स्वप्नील दुधाने यांनी म्हटले आहे की, आजवर विविध मार्गांनी आपण समाजकार्यात आपले योगदान देण्याचा लहानसा प्रयत्न केला आहे. याच प्रयत्नांचे यश म्हणजे वरिष्ठांनी आपल्या कामावर विश्वास ठेवत केलेली नियुक्ती आहे. त्यांनी दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन, असा विश्वास दुधाने यांनी व्यक्त केला आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

 

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.