Type Here to Get Search Results !

“व्हॅक्सीन ऑन व्हील्स” टू बी कंटिन्यू बाय विरेश शितोळे; तपोधाम वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे केले लसीकरण

 

पुणे, दि.२४ (चेकमेट टाईम्स): “व्हॅक्सीन ऑन व्हील्स” (Vaccine On Wheels) या उपक्रमाअंतर्गत वारजे कर्वेनगर (Warje Karvenagar) परिसरातील राजमुद्रा प्रतिष्ठानचे (Rajmudra Pratishthan) विरेश गोरखनाथ शितोळे (Viresh Gorakhnath Shitole) यांच्या माध्यमातून लसीकरण केंद्रावर जाऊ न शकणाऱ्यांसाठी (Disable People's Patients) काही महिन्यांपासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. त्यात सातत्य असल्याचे दिसत असून, आपली सामाजिक बांधिलकी दाखवून देत, शितोळे (Social Work by Viresh Shitole) यांनी सरगम सोसायटीमधील (Sargam Society Karvenagar) आनंदधाम वृद्धाश्रमातील (Ananddham Old Age Home) जेष्ठ नागरिकांचे (Senior Citizen) जागेवर जाऊन लसीकरण करून घेतले आहे.

 

शितोळे यांच्या माध्यमातून वारजे कर्वेनगर प्रभाग क्र.३१ मधील नागरिकांसाठी ही सुविधा मोफत (Free Covishield CoVaxin Vaccine) उपलब्ध करून देण्यात आलेली असून, त्याचा आतापर्यंत शेकडो नागरिकांनी लाभ घेतलेला आहे. त्यातच शितोळे यांच्या या उपक्रमाबाबत आनंदधाम वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनाला माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी शितोळे यांच्याशी संपर्क साधत लसीकरण करून देण्याबाबत विनंती केली. विशेष म्हणजे येथील ज्येष्ठ नागरिक हे या भागातील मतदार नसताना (Social Work for Non Voters) देखील, शितोळे यांनी कोणताही राजकीय स्वार्थ (Political Interests) न पाहता, आपली समाजाप्रती सामाजिक बांधिलकी दाखवून देत, क्षणाचाही विलंब न करता, या सर्व ज्येष्ठांच्या लसीकरणाची सोय केली.

आनंदधाम वृद्धाश्रमातील हे ज्येष्ठ नागरिक आपल्या देशाचे नागरिक आहेत. ते मतदार असले नसले तरी आपले आपल्या देशवासियांप्रती कर्तव्य आहे. त्यामुळे आपण त्यांना प्राधान्याने जागेवर लसीकरण करून दिल्याचे विरेश शितोळे यांनी चेकमेट टाईम्स’शी बोलताना सांगितले. तर आपण राजकारणात येण्यासाठी अथवा कोणते राजकीय पद भूषवण्यास मिळावे या इच्छेने हे सामाजिक काम करत नसून, कुटुंबियांकडून अशी कामे करण्यासाठी मिळणारी प्रेरणा आणि मित्र परिवाराकडून मिळत असलेली साथ आपल्याला असे सामाजिक काम करण्यास उद्युक्त करत असल्याचेही शितोळे यांनी चेकमेट टाईम्स’शी  (Checkmate Times) बोलताना सांगितले. तर भविष्यातही प्रत्येक नागरिकाला हवेहवेसे वाटेल अशा पद्धतीची निस्वार्थ सेवा करण्यासाठी आपण बांधील असल्याचे शितोळे यांनी सांगितले आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

 

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.