BJP corporator's husband joins NCP; Did Prashant Jagtap's word come true?
पुणे, दि.५ जानेवारी २०२२ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेची संभाव्य प्रभाग रचना (Pune Municipal Corporation Prabhag List) जाहीर झाल्यावर भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (NCP Pune City President Prashant Jagtap) यांनी केला होता. त्यावरून भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (BJP Pune City President Jagdish Mulik) यांच्यासह भाजपा नेत्यांनी प्रशांत जगताप यांच्या या विधानावर टीका केली होती. मात्र जगताप यांचा शब्द प्रभाग रचना जाहीर झाल्यावर पाच दिवस पूर्ण होण्याअगोदर खरा ठरताना दिसत असून, भाजपा नगरसेविकेच्या पतीने आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केलाय (BJP corporator's husband joins NCP). त्यामुळे राष्ट्रवादीने हा भाजपाला दिलेला पहिला झटका असल्याचे बोलले जाते आहे.
राज्य सभेचे माजी खासदार संजय काकडे यांचे समर्थक (Supporter of former Rajya Sabha MP Sanjay Kakade), २०१७ च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या, वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील (Vadgaon Sheri Vidhansabha) सध्याच्या प्रभाग क्रमांक २ (PMC Pune Prabhag No 2) मधील भाजपच्या नगरसेविका शितल सावंत यांचे पती अजय सावंत (BJP Corpoartor Shital Sawants Husband Ajay Sawant Join NCP) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज शनिवार दि.५ फेब्रुवारी २०२२ प्रवेश केला. महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी भाजपला पहिला धक्का बसला आहे.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालय (Pune Divisional Commissioner's Office) येथे सावंत यांनी कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश केला. यावेळी आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) उपस्थित होते. तर नगरसेविका शितल सावंत देखील लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार
असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. सावंत हे
भाजपाचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या वडगाव शेरी मतदार संघातील असल्याने मुळीक
यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुळीक यांनी प्रशांत जगताप यांना
प्रतिउत्तर देताना, तुमचेच उमेदवार सांभाळा, तेच आमच्या संपर्कात आहेत, असे म्हणत
इशारा दिला होता.
मात्र आता सावंत
यांनी पुणे महानगरपालिका
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी मध्ये केलेला प्रवेश महत्वाचा मानला जात
आहे. त्याला भाजपाकडून देखील चोख प्रतिउत्तर देण्याची तयारी सुरु झालेली असून,
लवकरच राष्ट्रवादीचा एक मोठा मोहरा भाजपाच्या गोटात घेतला जाणार असल्याची माहिती
देखील सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये इकडून तिकडे आणि
तिकडून इकडे असे चित्र पाहायला मिळाल्यास वावगे वाटायला नको.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली
काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो
करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या
इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/
आमच्या ट्विटर’ची
लिंक : https://twitter.com/checkmate_times