Type Here to Get Search Results !

फुकट चायनीज देत नसल्याने चायनीज सेंटरची नासधूस करून आचाऱ्याला मारहाण; शिवणे मधील घटना

 


पुणे, दि.१ फेब्रुवारी २०२२ (चेकमेट टाईम्स): फुकट चायनीज देत नाही या कारणावरून चिडून जाऊन चायनीज बनवणाऱ्या आचाऱ्याला चार ते पाच जणांनी मारहाण करत, (Beat the chef for not giving free Chinese) चायनीज सेंटरची तोडफोड (Demolition of the Chinese Center) केल्याची घटना उत्तमनगर पोलीस स्टेशन (Uttam Nagar Police Station) हद्दीतील शिवणे (Shivane) मध्ये घडली आहे. याबाबत उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील तिघे अल्पवयीन आहेत.

 

महात्मा गांधी पुण्यतिथी अर्थात रविवार दि. ३० जानेवारी २०२२ रोजी संध्याकाळी पावणे नऊच्या सुमारास, शिवणे मधील पंढरीनाथ कॉम्प्लेक्स (Pandharinath Complex Shivane Pune) मध्ये असलेल्या “प्रथमेश चायनीज” (Prathamesh Chienese) मध्ये सदरील घटना घडली. शिवणे मधील मुक्ताई क्लिनिक (Muktai Clinic Shivane Pune) समोर असलेल्या या प्रथमेश चायनीज मध्ये सदरील चार ते पाच जण शुक्रवार दि. २८ जानेवारी २०२२ रोजी चायनीज खायला आले होते. यावेळी मालकाने त्यांना फुकट चायनीज (Free Food) देण्यास मनाई केली होती.

 

त्याचा राग मनात धरून राहुल नगर मध्ये राहणाऱ्या या टोळक्याने, रविवार दि. ३० जानेवारी २०२२ रोजी संध्याकाळी पावणे नऊच्या सुमारास, “प्रथमेश चायनीज” मध्ये येऊन हप्त्याची मागणी करत, आचारी आणि फिर्यादी अशा दोघांना मारहाण केली. एवढ्यावर हे टोळके शांत बसले नाही, तर त्यांनी चायनीज सेंटरच्या किचनमधील वस्तू, खुर्चांची मोडतोड करत, शिवीगाळ करून परिसरात एकच दहशत पसरवली. त्यामुळे घाबरलेल्या आजूबाजूच्या सर्व व्यापारी दुकानदारांनी आपली दुकाने बंद केल्याने एकच खळबळ उडाली होती.

 

दरम्यान उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर, (Senior Inspector of Police Sunil Jaitapurkar), गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे  (Crime Police Inspector Arjun Botre) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे (Assistant Police Inspector Umesh Rokade) यांच्या पथकाने तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, एक जण फरार आहे. या अल्पवयीन असलेल्या तिघांवर प्रचलित विधीसंघर्षित बालक कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे करत आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

 

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.