Scrutiny of SC candidates in several wards of Pune; Eyes were also fixed on the OBC decision
पुणे,
दि.४ जानेवारी २०२२ (चेकमेट टाईम्स): नुकतीच पुणे महानगरपालिकेची (Pune Municipal Corporation) प्रारूप प्रभाग रचना (Prabhag / Ward Formation) जाहीर झाली आहे. त्यानंतर आता महिला आरक्षण आणि त्यातही अनुसूचित जाती आणि
अनुसूचित जमातीच्या महिला आणि पुरुष आरक्षणासह इतर मागासवर्गीय आरक्षणाकडे
अनेकांचे लक्ष लागले आहे. (Pune Municipal Corporation Election 2022 SC - ST - OBC - Ladies / Gents Reservations)
पुण्यातील २३ प्रभागांमध्ये अनुसूचित जाती (Pune Municipal Corporation Scheduled Cast SC Reservation) आणि २ प्रभागांमध्ये अनुसूचित जमातींचे (Pune Municipal Corporation Scheduled Tribe ST Reservation) आरक्षण आहे. इतर मागासवर्गीयांच्या (Pune Municipal Corporation Other Backword Class OBC Reservation) आरक्षणाचा निर्णय अद्याप झालेला नाही. हे आरक्षण देण्याचा निर्णय झाल्यास राज्य सरकारच्या यापूर्वीच्या आदेशानुसार इतर मागासवर्गीयांसाठी ४७ ठिकाणी आरक्षण असेल.
यामध्ये सध्या अनुसूचित जाती (SC Reservation) बाबत पाहिल्यास काही अपवादात्मक प्रभाग वगळता, इतर अनेक प्रभागांमध्ये अनुसूचित जातीच्या (ST Reservation) उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. तर महिला आरक्षणे (Womens Reservations in Pune Municipal Corporation) देखील कशी पडू शकतात, याबाबत आडाखे बांधून पुढील राजकीय समीकरणे (Pune Political Study) मांडली जाऊ लागली आहेत. महिला आरक्षणामुळे पसंतीच्या प्रभागात लढता येत नसल्यास अनेक जण राजकीय पक्ष बदलण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरक्षणाच्या सोडती’सह ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीनंतरच (OBC Reservation Hearing) संभाव्य प्रभागरचना कोणाच्या पथ्यावर पडणार हे स्पष्ट होणार आहे.
पुणे महानगरपालिकेतील
१७३ प्रभागांपैकी ५८ प्रभागांमध्ये किमान १ महिला उमेदवारासाठी आरक्षण असणार आहे. त्याशिवाय
५७ प्रभागांमध्ये उर्वरित २९ जागांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. सूत्रांनी
दिलेल्या माहितीनुसार २ सदस्यांच्या प्रभागाचा महिला आरक्षणाच्या सोडतीमध्ये विचार
केला जाणार नाही. त्यामुळे तीन सदस्यीय ५७ प्रभागांपैकी २९ ठिकाणी महिला आरक्षणाची
सोडत काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर १२ ठिकाणी अनुसूचित जाती आणि जमातींच्या पुरुषांना
लढण्याची संधी मिळणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra State Election Commision) प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करण्याच्या आदेशांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींच्या लोकसंख्येचे (Pune Population of SC - ST) प्रमाण जाहीर केले आहे. त्यामुळे ही आरक्षणे कुठल्या प्रभागात पडणार आहे, हे उघड झाले आहे. मात्र या आरक्षणांचा विचार करता महिला आरक्षण कुठल्या प्रभागात असेल हे सोडतीनंतरच स्पष्ट होणार असतानाच, तिकडे वारजे रामनगर - शिवणे – उत्तमनगर या प्रभाग क्रमांक ३५ (Warje Ramnagar Shivane Uttam Nagar Prabhag No.35) मधून प्रभाग जाहीर झाल्याच्या पुढच्या काही तासांमध्येच सर्वाधिक ११ जण प्राथमिक दर्शनी इच्छुक (SC Interested Candidates in Pune Election) झालेले असून, त्यात कालपरत्वे वाढ होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
त्यात
प्रामुख्याने शिवणे मध्ये राहत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे शहर
युवक अध्यक्ष किशोर हनुमंत कांबळे (Kishore Hanumant Kamble) हे या प्रभागातून अनुसूचित जातीच्या आरक्षणावर
निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्याचबरोबर
भगवान गायकवाड (Bhagwan Gaikwad), उमेश भिमराव कोकरे (Umesh Bhimrao Kokare), यशवंत ठोकळ (Yashwant Thokal), प्रशांत लांडगे (Prashant Landge), दीपक बलाढे (Dipak Baladhe), दिलीप
कदम (Dilip Kadam), प्रभाकर भोरकडे (Prabhakar Bhorkade), अंबादास धर्मकांबळे (Ambadas DharmaKambale) हे पुरुष अथवा त्यांच्या कुटुंबातील
महिला उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. त्याचवेळी महिला जागेसाठी
म्हणून इच्छुक असलेल्या नावात फक्त संगीता आठवले (Sangeeta Athawale) आणि आम्रपाली संतोष कदम (Amrapali Santosh Kadam) ही नावे
समोर आली आहेत.
यामधील
काहीजण आता असलेल्या पक्षाने जर उमेदवारी नाकारली तर ते दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात.
तर काही जणांची दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी आहे.
त्यामुळे वारजे रामनगर – शिवणे - उत्तमनगर प्रभागात महिलांसाठी २ जागा पडतात का १
आणि त्यातही अनुसूचित जातीचे आरक्षण महिलेसाठी पडते की पुरुषासाठी याकडे अनेकांचे
लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने प्रभागाच्या कच्चा आराखड्यास मान्यता दिल्यानंतर महानगरपालिकांनी तो प्रसिद्ध केला. यात महिला, अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण असणार, हे निश्चित आहे. तथापि, ओबीसींचे राजकीय आरक्षण (Political Reservationof OBC) रद्द झाल्याने त्यांच्या संख्येची नोंद कुठेही दर्शवण्यात आलेली नाही. यापूर्वीच्या निवडणुकीत ४ सदस्यीय प्रभाग (4 Candidate Prabhag Pune Election) पद्धत होती, आता ३ सदस्यीय (3 Candidate Prabhag Pune Election) आहे. त्यानुसार अनुसूचित जाती, जमाती व महिलांच्या आरक्षणाचा कोटा निश्चित झाला. मात्र जर ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय झालाच तर ते आरक्षण देण्यासाठी नव्याने प्रक्रिया करावी लागेल का, हे देखील स्पष्ट झाले नसल्याने अनेकजण संभ्रमावस्थेत आहेत.
ओबीसी
आरक्षणाविना निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असताना, ओबीसींच्या राजकीय
आरक्षणाबाबत महाराष्ट्र विधीमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकाला राज्यपालांनी मंजुरी
दिली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार?
याकडे लक्ष लागले आहे. राज्यपालांनी विधेयकावर केलेली स्वाक्षरी आणि सर्वोच्च
न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमुळे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था
उद्भवली आहे.
“ओबीसींना
आरक्षण मिळाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात” असा
निर्णय विधिमंडळात सर्वानुमते घेण्यात आला. या विधेयकावर मंगळवारपर्यंत सही झाली
नव्हती. त्यामुळे सत्ताधारी आघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार होते. पण
तत्पूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधेयकावर सही केली. “राज्यपालांनी सही
केल्यानंतर आता हा कायदा निवडणूक आयोगाला मान्य करावा लागेल”, असे मंत्री छगन
भुजबळ यांनी सांगितले. मात्र,
स्वायत्त असलेले राज्य निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे
ठरणार आहे.
त्याशिवाय
सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार
आहे. या सुनावणीत राज्य मागासवर्ग आयोगाच्यावतीने सादर करण्यात येणाऱ्या डेटाबाबत
सर्वोच्च न्यायलय काय निर्णय घेणार आहे, हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. जर ओबीसी आरक्षण
यशस्वी झालेच तर राज्य सरकारच्या यापूर्वीच्या आदेशानुसार इतर मागासवर्गीयांसाठी ४७
ठिकाणी आरक्षण असेल. यापैकी २४ जागांवर महिलांना आणि २३ जागांवरच पुरुषांना
निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे.
एकूण जागा :
१७३
महिला आरक्षण
(५० टक्के) : ८७
अनुसूचित जाती
: २३
अनुसूचित जमाती
: ०२
ओबीसी आरक्षण
(संभाव्य) : ४७
ओबीसी महिला
आरक्षण (संभाव्य) : २४
सर्वसाधारण
(अराखीव) : ५१
लेखन : धनराज मनोहर माने (संपादक चेकमेट टाईम्स)
Writen by: Dhanraj Manohar Mane (Editor Checkmate Times)
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली
काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या
इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/
आमच्या ट्विटर’ची
लिंक : https://twitter.com/checkmate_times
Pune election 2022, Pune election 2022 date, Upcoming election in Maharashtra, PMC Election 2022 News, Pune Municipal Corporation election date 2022, pmc election 2022 voter list pune, pmc election 2022 news, pmc election 2022 date, pmc election 2022 ward list, pmc election 2022 ward map, pmc election 2022 ward, pmc election 2022 news marathi, pmc election 2022 reservation list, pmc election 2022 reservations, pune municipal corporation ward map 2022