Type Here to Get Search Results !

या कारणामुळे धायरी, डीएसके विश्व आणि सिंहगड रस्त्याच्या परिसरात दुपारपासून विजेचा लपंडाव सुरु

 

पुणे, दि. २८ मार्च २०२२ (चेकमेट टाईम्स): डिएसके विश्व (DSK Vishwa, Sinhgad Road, Dhayari, Pune) परिसरात पाण्याच्या पाईपलाईनसाठी जेसीबीद्वारे (Pune Corporation Water Line) सुरु असलेल्या खोदकामात सोमवारी (दि. २८) दुपारी १.२० वाजता महावितरणची २२ केव्ही क्षमतेची भूमिगत वीजवाहिनी (MSEDCL 22KV Line Break) तोडली. परिणामी डिएसके उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडल्याने धायरी गाव, डिएसके विश्व, रायकर मळा, सिंहगड रस्त्याचा काही भाग येथील सुमारे २५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. (Power supply to about 25,000 consumers in Dhayari village, DSK Vishwa, Raikar Mala, part of Sinhagad road was disrupted.)

दरम्यान पर्यायी व्यवस्थेतून दुपारी वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता. मात्र त्यातील ओव्हरहेड तार तुटल्याने वीजपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला. भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम रात्री ७.३० वाजेपर्यंत पूर्णत्वास गेले होते. त्यानंतर चाचणी घेऊन रात्री ८.१५ वाजेपर्यंत सर्व परिसरातील वीजपुरवठा सुरु करण्यात येत आहे.

याबाबत माहिती अशी की, नांदेड सिटी २२० केव्ही उपकेंद्रातून राजयोग २२ केव्ही भूमिगत वाहिनीद्वारे महावितरणच्या डिएसके उपकेंद्राला वीजपुरवठा केला जातो. (Power is supplied to MSEDCL's DSK substation from Nanded City 220 KV substation through Rajyog 22 KV underground channel.) डिएसके विश्व परिसरात पाइपलाईनसाठी जेसीबीद्वारे आज खोदकाम सुरु आहे. त्यामध्ये ही राजयोग वीजवाहिनी तोडण्यात आल्याने डिएसके उपकेंद्राचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद पडला. परिणामी या उपकेंद्रातून निघणाऱ्या चारही वीजवाहिन्यांवरील धायरी गाव, रायकर मळा, डिएसके विश्व व सिंहगड रस्त्याचा काही भाग या परिसरातील वीजपुरवठा दुपारी १.२० वाजता खंडित झाला. (The power supply was cut off) यातील आणखी एका प्रकारात डिएसके विश्व येथील महावितरणच्या रिंगमेन युनीट जवळ आग लागल्याने तेथील वीजवाहिन्यांना मोठी झळ बसली व त्याचीही तातडीने दुरुस्ती करावी लागली.

महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांनी पर्यायी वीजपुरवठ्यासाठी ताबडतोब तांत्रिक उपाययोजना केली व दुपारी ४.१५ वाजता सर्व परिसरातील वीजपुरवठा सुरु केला होता. मात्र सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पर्यायी व्यवस्थेमधील एक ओव्हरहेड वीजतार तुटल्याने वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला. दरम्यान रात्री ७.३० वाजेपर्यंत तोडलेल्या भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्णत्वास गेले होते. त्यानंतर चाचणी घेऊन रात्री ८.१५ वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे. खंडित वीजपुरवठ्याबाबतची माहिती संबंधित वीजग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळविण्यात आली.

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.