Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र शासन सन्मानित या कामगार भुषण आणि गुणवंत कामगारांचा डॉ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सन्मान

 

Government of Maharashtra Kamgar Bhushan, Qualified workers Award 

पुणे, दि.३० एप्रिल २०२२ (चेकमेट टाईम्स): विचार श्रमापेक्षा शारीरिक श्रम हे अधिक निर्णायक आहेत. बुद्धीच्या श्रमाला श्रेष्ठत्व दिले गेले, कामाच्या तुलतेत श्रमिकांना मिळणारा मोबदला अत्यल्प दिला जातो. शारीरिक श्रम आणि बौद्धिक श्रम करणाऱ्या कष्टकरी वर्गात बरीच मोठी दरी आहे, ही विषमता दूर करण्यासाठी समाजाने पावले उचलायला हवीत. कारण श्रमाच्या घामात एक विलक्षण कलात्मकता आहे, असे परखड मत डॉ.श्रीपाल सबनीस (Dr Shripal Sabnis) यांनी मांडले.

 



महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद (Maharashtra Kamgar Sahitya Parishad) आणि किर्लोस्कर कमिन्स मित्र परिवार (Kirloskar Cummins Friend Family) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पूर्ण महाराष्ट्रात एकाच कामगाराला दिला जाणारा आणि मानाचा असलेला “महाराष्ट्र शासनाचा कामगार भूषण” पुरस्कार (Government of Maharashtra Kamgar Bhushan Award) मिळाल्याबद्दल राजेंद्र वाघ (Rajendra Wagh) आणि गुणवंत कामगार (Government of Maharashtra Meritorious Worker Award) संजीव माने (Sanjeev Mane), दिलीप पासलकर (Dilip Pasalkar) यांचा जाहीर सत्कार डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी नगरसेवक दिलीप बराटे (Corporator Dilip Barate,), शिवाजी खटकाळे (Shivaji Khtkale), महेंद्र बालवडकर (Mahendra Balwadkar), राजेंद्र कुलकर्णी (Rajendra Kulkarni), बाबा धुमाळ (Baba Dhumal), सुदाम भोरे (Sudam Bhore), मुरलीधर साठे (Murlidhar Sathe), वि.दा. पिंगळे (Vikas Pingale), दादासाहेब कोरेकर (Dadasaheb Korekar), नामदेव चव्हाण (Namdeo Chavan), संदिप चव्हाण (Sandip Chavan), प्रविण दरेकर (Pravin Darekar), रविंद्र रायकर (Ravindra Raikar), बाळासाहेब गरुड (Balasaheb Garud), किरण गहेरवार (Kiran gaherwar), सारस्वत बँकेच्या अधिकारी वर्षा चतुर्वेदी (Varsha Chaturvedi of Saraswat Bank Officers) यांच्यासह कमिन्स मधील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रास्तविक पुरुषोत्तम सदाफुले (Purushottam Sadafule) यांनी, तर सूत्रसंचालन बाळकृष्ण नेहरकर (Balkrishna Neharkar) यांनी केले. आभार प्रदर्शन बापूसाहेब सरोदे (Bapusaheb Sarode) यांनी केले. आयोजन महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद (Maharashtra Kamgar Sahitya Parishad) आणि कमिन्स मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.