Warje Katraj Six-seater rickshaw travel became expensive; 4 lakh 30 thousand hit to the passenger
पुणे, दि.२० मे २०२२ (चेकमेट
टाईम्स): कात्रज वरून वारजे मध्ये येण्यासाठी सहाआसनी रिक्षामधून प्रवास करणाऱ्या
महिलेला हा प्रवास चांगलाच महागात पडला असून, त्या महिलेला तब्बल ४ लाख ३०
हजारांचा फटका बसला आहे. याबाबत त्या महिलेने वारजे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली
असून, वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल सावंत पुढील तपास करत आहेत.
याबाबत वारजे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर मध्ये राहणारी सदरील ६३ वर्षीय महिला
कात्रजच्या गुजरवाडी मधील आपल्या बहिणीच्या घरातील कौटुंबिक कार्यक्रम उरकून
गुरुवार दि.१९ मे २०२२ रोजी दुपारी २ ते २.३० च्या दरम्यान, त्यांच्या कर्वेनगर
येथील घरी जात होत्या. यावेळी कार्यक्रमावरून जाताना या महिलेने आपल्याकडील अंदाजे
११ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आपल्याकडील पिशवी मध्ये ठेवले होते. मात्र सदरील
महिलेला घरी परतल्यानंतर पिशवी मध्ये दागिने आढळून आले नाहीत.
यानंतर सदरील महिलेने
तातडीने वारजे पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत घडल्या प्रकाराबद्दल माहिती दिली.
यावेळी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून घेत, तपासाची चक्र फिरवली. मात्र ज्या
सहाआसनी रिक्षामध्ये सदरील महिलेने प्रवास केला होता, ती सहाआसनी रिक्षा मिळून आली
नाही. मात्र या सहाआसनी मध्ये सहापेक्षा अधिक प्रवासी दाटीवाटीने कोंबलेले होते.
त्यामुळे प्रवासादरम्यान कोणी सहप्रवासी चोरट्याने दागिने काढून घेतले, की रस्त्यात
कुठे गहाळ झाले, हे सदरील महिलेच्या लक्षात आले नसल्याचे समोर आले आहे.
या वारजे ते कात्रज,
वारजे ते वाकड आंनी वारजे उत्तमनगर मार्गावर सहाआसनी रिक्षांमधून क्षमतेपेक्षा
अधिक प्रवासी बसवत बेकायदा प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असते. वारजे
वाहतूक विभाग असलेल्या चौकातच या सहाआसनी रिक्षा बिनदिक्कत वाहतुकीला अडथळा करत,
प्रवासी घेण्यासाठी घोळक्याने थांबलेले असतात. मग ती वेळ सकाळच्या गर्दीची असो की
संध्याकाळच्या गर्दीची, त्यांना कोणाचीच फिकीर नसते. एवढा निर्ढावलेपणा त्यांच्यात
येतो कुठून? त्यांच्या गाड्या सुस्थितीत आहेत का? त्या सहाआसनीवरील चालकांकडे
वाहनचालक परवाना आणि सहाआसनीचा फिटनेस असतो का? पीयूसी आणि इन्शुरन्स अपडेट असतात
का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत असून, कोणाच्या आशिर्वादाने ही बेकायदा
प्रवासी वाहतूक सुरु आहे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर
फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर
चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो
करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84