दि.२२ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): शिवसेनेत बंडखोरी करून महाविकास आघाडी सरकारमध्ये भूकंप घडवून आणणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याबाजूने 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. मात्र, यापैकी काही आमदारांना फसवून गुजरातला नेण्यात आल्याचे समोर येत आहे. कालच शिंदे यांच्या तावडीतून सुटून आलेले उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सुटकेचा थरारक प्रसंग सांगितला.आज अकोल्याच्या बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी तर धक्कादायक प्रकार सांगितला आहे. देशमुख यांना हार्ट अटॅक आल्याचा बनाव रचण्यात आला. यानंतर त्यांना रुग्णालयात नेऊन 20-25 जणांनी त्यांना पकडून बळजबरीने इंजेक्शन टोचण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या गोटातून सुटका करून घेतलेले आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले की, “माझा रक्तदाब वाढला नव्हता. मला हार्ट अटॅक आल्याचा बनाव रचण्यात आला. मला रुग्णालयात नेल्यानंतर 20-25 जणांनी पकडून बळजबरीने इंजेक्शन दिले. ते इंजेक्शन कसले होते हे माहित नाही.”
देशमुख पुढे म्हणाले की, “माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचे षडयंत्र रचले होते. मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे, मी मंत्र्यांसोबत गेलो होतो पण मी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आता मी माझ्या घरी जात आहे. मी रात्री 12 वाजता हॉटेलमधून निघालो. रस्त्यावर तीन वाजता उभा होता. पण माझ्यापाठी 200 पोलीस होते. कोणतेही वाहन मला लिफ्ट देत नव्हते. त्यानंतर पोलीस मला रुग्णालयात घेऊन गेले आणि मला हार्ट अटॅक असल्याचा बनाव रचला. देशमुख म्हणाले, अटॅकचे कारण सांगून मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणं झाले आहे.शिवसेना नेते संजय राऊत यांनी कालच गंभीर आरोप केले होते की, मंगळवारी दुपारी नितीन देशमुखांना सूरतच्या हॉटेलमधून निघत असताना त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. मुंबईतून त्यांचे अपहरण केले गेले. सोमवारी रात्री त्यांनी स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना गुजरात पोलिसांनी आणि गुंडांनी बेदम मारहाण केली. मुंबईतील गुंड देखील तेथे आहेत गुजरातच्या भूमीवर हिंसा कशी?, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला होता.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84