दि.२१ जून २०२२
(चेकमेट टाईम्स): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील कल्याणी फोर्ज
कंपनीमध्ये काम करणारा कामगार युवक कंपनीतील क्रेनवरुन पडल्याने डोक्याला मार
लागून आकाश अतुल भुजबळ या २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून
शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कोरेगाव भीमा ता.
शिरुर येथील कल्याणी फोर्ज कंपनीत आकाश भुजबळ हा युवक कामाला आहे, १९ जून रोजी कंपनीतील मटेरियल क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचे ठरले होते.
दुपारच्या सुमारास आकाश हा एकटा क्रेनवर गेला. मात्र अचानकपणे क्रेनवरुन खाली
पडला. यावेळी त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याला सणसवाडी येथील खाजगी
रुग्णालयात उपचारासाठी नेले असता आकाश अतुल भुजबळ (वय २५)रा. तळेगाव ढमढेरे (ता.
शिरुर) जि. पुणे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याबाबत देवराव सुग्रराव
भोसले (वय ३८) रा. साई कॉलनी हडपसर पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर
दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास
सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84