Type Here to Get Search Results !

कोथरूड पौड रोड कचरा डेपोसमोरील अपघात प्रवण रोडवर आपच्या पाठपुराव्यामुळे मनपा प्रशासनाकडून अपघात प्रतिबंधक उपाययोजना सुरू.

 




पुणे, दि. ११ जून २०२२ (चेकमेट टाईम्स):  कोथरूड परिसरातील पौड रस्ता कचरा डेपो बाहेरील रोडवर कचरा ट्रक जेव्हा तिथून जात असताना कचऱ्यातील तेल गळतीमुळे रस्ता निसरडा होत असतो. पावसाळ्यात या रस्त्यावर अनेक गंभीर अपघात होत असतात. गेल्यावर्षी ही बाब आम आदमी पक्षाच्या जेव्हा निदर्शनास आली तेव्हापासून आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे, परंतु मुजोर, बेमालूम प्रशासनाने यावर गेल्यावर्षी काहीच केले नाही. या निसरड्या रस्त्यावर आतापर्यंत झालेल्या अपघातांत अनेक जणांना गंभीर दुखापत, कायमस्वरूपी अपंगत्व तसेच त्यामुळे आपले रोजगार देखील गमवावे लागले आहेत. परंतु यावर्षी दुर्घटनांची पुनरावृत्ती पावसाळ्यात होण्याची शक्यता असल्यामुळे आप राज्य वाहतूक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष श्रीकांत आचार्य यांनी अगोदरच मनपा प्रशासनाकडे यासंबंधी पाठपुरावा सुरू केला होता. निगरगठ्ठ मनपा प्रशासन याही वेळी दाद देण्याच्या मनःस्थितीत नव्हते परंतु श्रीकांत आचार्य, सुहास पवार, ज्योती ताकवले, आरती करंजावणे या आपच्या शिष्टमंडळाने मनपा अधिकाऱ्यांची काल भेट घेऊन सक्त ताकीद दिली की जर या ठिकाणी कुठला अपघात झाल्यास आणि कुणाला अपंगत्व आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करू अथवा कुणाचा मृत्यू झाल्यास मनपा प्रशासनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार. तसेच आप राज्य संघटक विजय कुंभार यांनी झोन ३ च्या डीसीपीसोबत फोनवर चर्चा केली. यानंतर प्रशासनाने जागे होत आज रस्ता स्वच्छ केला जात आहे, तसेच पुन्हा रस्ता निसरडा होऊ नये यासाठी स्क्रबर बसवण्यात येत आहे. आम आदमी पक्षाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याने आज हे काम होत आहे.

"या रस्त्यावर अनेक लोकांचे गंभीर अपघात झाले होते, अगदी काल-परवा झालेल्या पावसाने अनेक दुचाकी येथे घसरल्या होत्या. प्रशासन कालसुद्धा दाद देण्याच्या मनःस्थितीत नव्हते परंतु आम्ही संयम न सोडता भेट न देऊ पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तिथे नाईलाजाने फेसबुक लाईव्ह देखील केले. मात्र सरतेशेवटी प्रशासनाने नमते घेत आज अपघात होऊ नये, यासाठीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली.", श्रीकांत आचार्य, आप वाहतूक संघटना प्रदेश अध्यक्ष.

"प्रशासन दाद देत नसताना देखील आप कार्यकर्त्यांनी संयम न सोडता विषयाचा पाठपुरावा कायम ठेवला. शेवटी आप कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांस यश मिळाले. पुणेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम आदमी पक्ष कायम कटिबद्ध आहे.", विजय कुंभार, आप राज्य संघटक.आपचे किरण कांबळे, फेबिनो, अनिल कोंढाळकर, पियुष हिंगणे, निसार सय्यद देखील यावेळी उपस्थित होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.