दि.२१ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): शिंदवणे (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील
घाटात वारकऱ्यांना घेऊन चाललेल्या ट्रक चालकाचा वळण चुकविताना अपघात झाल्याची घटना
सोमवारी (ता. २०) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात या
ट्रकमधील केबीनवर बसलेल्या ९ व्यक्ती या केबीनवरुन सुमारे २५ फूट खाली डांबरीवर
आपटल्याने ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील साखरवाडी येथून येथील ग्रामस्थ पंढरपूरला
आषाढी वारीसाठी ट्रकमधून आळंदीला निघाले होते. हा ट्रक जेजुरी मार्गे शिंदवणे
घाटातून चालला होता. ट्रकने पहिले वळण घेतल्यानंतर दुसऱ्या वळणावर चालकाला ब्रेक
निकामी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर चालकाने हा ट्रकचा टमाथ्यावर इतर पर्यायी
जागेवर वळण्याचा प्रयत्न केला .पण ट्रक नियंत्रणात न आल्याने ट्रक तसाच पुढे सरकत
जाऊन पुढे असलेल्या वळणावरील २५ फूट कड्यावर ट्रक लटकला. आणि केबीनच्या टपावर
बसलेले ९ वारकरी रस्त्यावर आपटले गेले. या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळायच शिंदवणे ग्रामस्थांनी अपघात घडताच तातडीने घटनास्थळी
धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. तसेच कस्तुरी प्रतिष्ठान व अजिंक्य चॅरीटेबल
फाऊंडेशनच्या रुग्णवाहिकेतून जखमींना तातडीने उरुळी कांचन येथील सिध्दीविनायक
हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84