दि.२५
जून २०२२ (चेकमेट टाईम्स ): राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट
टाकल्याप्रकरणी सध्या कोठडीत असलेली अभिनेत्री केतकी चितळे हिची अखेर आज ठाणे
कारागृहातून सुटका झाली आहे.
न्यायालयातून बाहेर येताना केतकीच्या चेहऱ्यावर हास्य होते, कुठेही दुःख दिसत नव्हते. यावेळी केतकीचे वकील
योगेश देशपांडे तिच्यासोबत होते. अजूनही न्याय मिळायचा बाकी आहे, असे केतकी चितळे व तिच्या वकिलांचे म्हणणे आहे.
जय हिंद जय महाराष्ट्र, जेव्हा बोलायचे
तेव्हा बोलेल. मी आत कारागृहात एफवायबीएच्या मुलांना शिकवत होते. खूप छान वाटत
होते. त्यांना शिक्षकांची गरज आहे, अशी प्रतिकक्रिया
केतकीने दिली.
शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केतकीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. या गुन्ह्यात तिला ठाणे न्यायालयाने काल 20 हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. नवी मुंबई येथे दाखल अट्रोसिटीच्या गुन्ह्यात तिला यापूर्वीच जामीन मिळालेला आहे. त्यामुळे केतकीची कारागृहातून आज सुटका झाली आहे. कोरोना काळात केतकीवर रबाळे पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आठ महिन्यांपूर्वी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून केतकीने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, हा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्याच प्रकरणात रबाळे पोलिसांनी केतकीला अटक केली होती. या गुन्ह्यात केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, केतकीने रबाळे पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी वकिलामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर 16 जून रोजी ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला 25 हजाराच्या जातमुचलक्यावर व अटीशर्थींवर जामीन मंजूर केला होता. मात्र, केतकीवर कळवा पोलीस ठाण्यात शरद पवार यांच्यावर आशेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यात देखील तिला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84