पुणे, १४ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): नाटकातील काही गाणी व्हिडीओ स्वरूपात आणण्याचा प्रयोग मधुसूदन कुलकर्णी आणि श्रीनिवास कुलकर्णी यांनी काही महिन्यांपूर्वी सुरु केला त्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभताना दिसत आहे. त्यामुळेच ‘वन मिनिट सॉंग’ या प्रयोगातील आणखी एक गाणं "अंधार सावलीचा" हे रसिकांच्या भेटीला आलं आहे, "अंधार सावलीचा" हे एक विरह गीत असून कामावर गेलेल्या नवर्याच्या आठवणीत पत्नीला प्रत्येक क्षण हा वेदना देणारा वाटायला लागतो, त्यावरच हे गीत बेतलेले असून या गीतामद्धे रौद्र चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी उर्मिला जगताप प्रमुख भूमिकेत दिसेल.
नाटकातील गाणे असल्यामुळे या गाण्याची लांबी जेमतेम सव्वा मिनिट असून, या गाण्याचे चित्रीकरण व दिग्दर्शन राहुल झेंडे यांनी केले आहे. हे गाणं गायिका निकिता पुरंदरेच्या आवाजात स्वरबद्ध झाले असून ते अक्षय संत यांनी शब्दबद्ध केले आहे. या गाण्याला स्वप्निल सावंत यांनी संगीतबद्ध केलेले असून याची अरेंजमेंट सुबोध भागात यांनी केली आहे.
अभिनव
प्रयोगाबद्दल बोलताना उर्मिला जगताप म्हणाली कि “एक ते सव्वा मिनिट लांबीच्या गाण्याची संकल्पना
खूपच आवडली, आणि
गाण्याची चाल देखील आवडल्यामुळे हे गीत करण्याचा निर्णय घेतला, अगदी कमी वेळात आनंद देऊन जाणारं
हे गाणं आहे आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांनाही हा प्रयोग नक्की आवडेल”.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा !
आम्हाला खाली देण्यात
आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.......!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब
करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब
करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes