Type Here to Get Search Results !

‘धर्मवीर’मध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा संताप, म्हणाला, “राजकीय घडामोडी सुरु असताना…”



दि.२५ जून २०२२ (चेकमेट टाईम्स ): महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी सुरु आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३० पेक्षा जास्त आमदार असून ते सध्या आसाम राज्यातील गुवाहाटी येथे आहेत. राजकीय विश्वात अनेक आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. राजकारणाबाबत अनेकजण विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अशामध्येच कलाविश्वातील काही मंडळींनी आपलं मत मांडलं आहे. आता धर्मवीरचित्रपटात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता क्षितीश दाते याने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे संताप व्यक्त केला आहे.

अभिनेता क्षितीश दातेने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. क्षितीशने एका वृत्तपत्राच्या कात्रणाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये क्षितीक्षचा धर्मवीरमधील लूक पाहायला मिळत आहे. तसेच थोडे दिवस मलाच एकनाथ समजून बैठकीत घ्याअसं या फोटोबरोबर लिहिलेलं दिसत आहे. हा फोटो शेअर करत क्षितीशने म्हटलं आहे की, “मोठी राजकीय उलाढाल चालू आहे. चेष्टेमध्ये मीम्स येणं वेगळं आणि वर्तमानपत्रात छापणं हे वेगळं. हे असं छापणं चूक आहे.एका वर्तमानपत्रामध्ये मीम्स छापून आल्याने क्षितीशने सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला आहे. धर्मवीरचित्रपटात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिशने उत्तमरित्या साकारली. या चित्रपटामुळे त्याला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. क्षितीशने मराठी नाटक, चित्रपटांमध्ये आजपर्यंत उत्तम काम केलं. धर्मवीरचित्रपटामधील भूमिकेमुळे त्याचं विशेष कौतुक झालं. महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबत हेमंत ढोमे, आरोह वेलणकर, ऋषिकेश जोशी सारख्या कलाकारांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.