पुणे, १४ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): देशपातळीवर राममंदिर, काशी, मथुरा, कुतुबमिनार, ताजमहल आणि भोजशाळाच नव्हे, तर हजारो मंदिरे मुघल, पोर्तुगिज आदी आक्रमकांनी पाडली आहेत. भारत स्वतंत्र झाला; मात्र हिंदूंची प्राचीन धार्मिकस्थळे परकीय दास्यतेत तशीच राहिली. त्यामुळे आक्रमकांनी विध्वंस केलेल्या मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी देशव्यापी मोहीम उघडण्याचा संकल्प समस्त मंदिर संघटना, भक्त, पुरोहित आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आला.यात गोव्यातील विध्वंसित मंदिरांविषयी पुरावे मिळाल्यास त्या विषयी न्यायालयीन लढा दिला जाईल, असा निर्धार गोवा येथील दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या द्वितीय दिनी अधिवक्त्यांकडून करण्यात आला. या लढ्यासाठी गोमंतकातील जनतेने त्यांच्याकडे उपलब्ध असलेले पुरावे हिंदु जनजागृती समितीला उपलब्ध करून देण्याचे आवाहनही श्री रामनाथ देवस्थानातील विद्याधिराज सभागृहात (फोंडा, गोवा) आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले.
या
वेळी व्यासपिठावर सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन, वाराणसी येथील अधिवक्ता मदन मोहन
यादव, गोवा येथील ‘भारत माता की जय’ संघटनेचे संघचालक श्री.सुभाष
वेलिंगकर, ‘गोवा मंदिर
महासंघा’चे सचिव
श्री.जयेश थळी आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री.रमेश शिंदे
उपस्थित होते. या वेळी अधिवक्ता विष्णु जैन म्हणाले की, मंदिरांचे पुनर्निर्माण करण्याच्या
या मोहिमेत पुढील सूत्रे आमच्या संशोधनाचा केंद्रबिंदु राहिल. यात विवादित स्थळाचे
पौराणिक महत्त्व, नष्ट
केल्याची ऐतिहासिक साक्ष, खटल्याचा इतिहास, पुरावे आणि कायदेशीर आधार आदींचा अभ्यास केला
जाईल. संशोधनाअंती मंदिरे पाडली गेल्याचे सिद्ध झाले, तर त्यांच्या जीर्णाेद्धारासाठी
आम्ही न्यायालयीन लढा चालू करू. सध्या अनेक विवादित स्थळे पुरातत्व सर्वेक्षण
खात्याच्या नियंत्रणाखाली असून सदर खाते अधिनियम 1958 कलम 16 च्या विरुद्ध कृती
करत आहे. एक सच्चा हिंदु या नात्याने अशा मंदिरांचे पुनर्निमाण करून भारताची सांस्कृतिक
परंपरा पुनर्स्थापित करण्याची शपथ घेत आहोत.
या
वेळी ‘भारत माता की
जय’ संघटनेचे
गोवा राज्य संघचालक श्री. सुभाष वेलिंगकर म्हणाले की, पोर्तुगिजांच्या काळात 1 हजारांहून
अधिक मंदिरे उद्धवस्त करण्यात आली. यातील दोन मंदिर चर्चच्या आक्रमणापासून वाचली
असून यातील एक वरेण्यपुरी (वेर्णा) येथील आणि दुसरे श्री विजयादुर्गा देवीचे मंदिर
आहे. हे मंदिर राज्य पुरातत्व विभागाच्या अंतर्गत संरक्षित म्हणून घोषित केलेले
असतांनाही या मंदिराची भूमी गिळंकृत करण्याचे षडयंत्र चर्चच्या माध्यमातून चालू
आहे. या आक्रमणाच्या विरोधात हिंदू भाविकांना एकत्र येऊन लढा द्यावा लागेल ! या
अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org
याद्वारे, तसेच ‘HinduJagruti’
या ‘यु-ट्यूब’ चॅनेल द्वारेही केले जाणार आहे.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा !
आम्हाला खाली देण्यात
आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.......!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब
करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब
करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes