दि.२४ जून २०२२ (चेकमेट टाईम्स ): राज्यात एकनाथ शिंदे आमदारांसहित सुरत आणि मग गुवाहाटीला गेल्यानंतर
राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेत फूट पडल्याचे चित्र सर्वत्र दिसू लागले
आहे. महाविकास आघाडी सरकार पडणार कि राहणार याबाबत तर्क वितर्कही लावले जात आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार याबाबत राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित
केले जात आहेत. याबाबत भाजप कोणतीही प्रतिक्रिया देताना दिसून येत नव्हते. परंतु
चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील या राजकीय भूंकपावर आपली पहिली प्रतिक्रिया
दिली आहे. आषाढी एकादशीला त्या वेळचा मुख्यमंत्री जो असेल तो पांडुरंगाची पुजा
करणार असलयाचे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. पुण्यात पालखी सोहळ्यानिमित्त आले
असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
एकनाथ शिंदे यांनी आम्ही बाळासाहेबांच्या
तत्वावर चालणारे आहोत. हिंदुत्व सोडणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच भाजप
आणि शिवसेनेने एकत्र यावे असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना
अधिकच वेग प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार याबाबत
राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र
फडणवीस यांचे नाव चर्चेत आहे.आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांच्या
हस्ते पांडुरंगाची पूजा केली जाते. परंतु कालच्या या घडामोडीनंतर दरवर्षी होणारी
पांडुरंगाची पूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावी. अशी वक्तव्य भाजप
नेत्यांकडून केली जात आहेत. त्याबाबत यावेळीच पांडुरंगाची शासकीय पूजा कोण करणार? असा प्रश्न पाटलांना विचारला होता. त्या
वेळचा मुख्यमंत्री जो असेल तो पांडुरंगाची पुजा हे त्यांनी उत्तर दिले आहे. तसेच
मुख्यमंत्री यांच्या फ़ेसबुक लाइव्ह बाबत माझे काही म्हणणे नाही असही ते म्हणाले
आहेत.
फडणवीस दिल्लीला का गेले? असे पाटलांना विचारले असता ते म्हणाले.
आमच्याकडे एक पद्धत आहे. कोणतीही मोठी निवडणूक जिंकलो की दिल्लीत जाऊन पक्ष
श्रेष्ठींना माहिती द्यावी लागते. आणि त्यासाठी फडणवीस हे दिल्लीला गेले आहे. मी
खूप दिवस मुंबईत राहिलो असल्याने मी इथ आलो आणि ते दिल्लीला गेले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84