दि.२५ जून २०२२ (चेकमेट टाईम्स ): भाजपसोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट संकेत शिवसेनेचे बंडखोर नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यामुळे भाजपा-शिंदे -शिंदे युतीचे सरकार राज्यात स्थापन करण्याच्या हालचाली एक-दोन दिवसात गतिमान होतील, असे मानले जात आहे. भाजपाकडं असलेल्या ईडी, आयकर विभाग आणि सीबीआय या तीन अतिशय प्रभावी कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच महाराष्ट्रातलं सरकार पाडण्याच्या उलथापालथी होत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. भाजपा ज्या पद्धतीनं पाशवी वृत्ती दाखवून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्रमधील महाविकास आघाडीचे सरकार पाडतेय, हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक असल्याचं राजू शेट्टी म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेकडून १२
आमदारांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर एकनाथ शिंदे
यांनी प्रतिक्रिया दिली आहे.निलंबन करण्याचा अधिकारच नाही. कारण आमच्याकडे
संख्याबळ जास्त आहे आणि ते संख्याबळ सिद्ध करुन दाखवण्याची आमची ताकद आहे, असं एकनाथ शिंदे
म्हणाले. बैठकीला उपस्थित
राहिलो नाही, म्हणून तुम्ही आमदारकी रद्द करण्याची मागणी करताय..असं कधी
होतं का?, बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे म्हणून आमदारांचं निलंबन
केलं जावं, असं देशात कोणतंही उदाहरण नाही. तसेच संख्याबळ सिद्ध करुन
दाखवण्याची आमची ताकद आहे, असा दावा एकनाथ शिंदेंनी केला.
एकनाथ शिंदेंच्या
बंडामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच हात असल्याचे सांगण्यात येत हे. सध्या जे
काही सुरु आहे, ती शिवसेनेचीच खेळी आहे. उद्धव ठाकरे यांनीत एकनाथ शिंदेंसह
इतर आमदारांना गुवाहटीला पाठवल्याची चर्चाही रंगली आहे, असा सवाल
माध्यमांनी विचारला. त्यावर मला या चर्चांबाबत काही माहिती नाही, असं एकनाथ शिंदेंनी
उत्तर दिलं.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84