दि.२१ जून २०२२
(चेकमेट टाईम्स): सामाजिक
न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांच्यावर
अॅट्रोसिटीचा गुन्हा करण्यात आला होता. या प्रकरणी येरवड्यातील महिलेने फिर्याद
दिली होती. अखेर पोलिसांनी कारवाई करत करुणा शर्मा यांना अटक केली आहे पुण्यातील
येरवडा पोलिसात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आता होता त्यानंतर ही
कारवाई झाल्याचे समोर येतंय, एका महिलेचा पती व करुणा शर्मा यांनी शस्त्राचा धाक
दाखवून जातीवाचक शिवीगाळ करणे, अपहरण करून पतीसोबत घटस्फोटासाठी जीवे
मारण्याची धमकी दिल्याचा आरोप एका महिलेने केला होता. या प्रकरणात शर्माचा पाय
आणखी खोलात गेला आहे.करुणा शर्मा यांच्या विरोधात पुण्यात अॅट्रोसिटीचा गुन्हा
दाखल केला आहे.
पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व तिचा पती हे उस्मानाबादला राहत
होते. नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांच्या पतीची ओळख करुणा शर्मा यांच्याबरोबर झाली
त्या आपली ओळख करुणा मुंडे असे करून दिली फिर्यादीचा पती वारंवार करुणा शर्मा
यांच्या घरी राहू लागला त्यानंतर फिर्यादी व त्यांचा पती पुण्यात येऊन स्थायिक
झाले पती हा शर्मा यांच्याशी वारंवार बोलत होता १६ फेब्रुवारी २०२२ रोजी
कार्यक्रमाला जायचे म्हणून पतीने फिर्यादीला भोसरी येथे नेले. येथे करुणा शर्मा यानी हॉकीस्टीकचा धाक दाखवत जातीवाचक शिवीगाळ केली
फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त
किशोर जाधव करत आहेत.
घटस्फोटासाठी
महिलेस जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महिलेच्या पतीसह शर्माविरुद्ध ऍट्रोसिटीचा
गुन्हा दाखल होता. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी
वैयक्तीक आरोप केल्यानंतर शर्मा यांचे नाव पुढे आले होते. अजयकुमार विष्णू देडे
(वय 32, रा. शिवाजीनगर, उस्मानाबाद), करुणा शर्मा (वय 43, रा. सांताक्रुज, मुंबई) असे गुन्हा दाखल
झालेत्यांची नावे त्यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे, अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (ऍट्रोसिटी)
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84