Type Here to Get Search Results !

मोठी बातमी! ठाकरे सरकार मोठ्या संकटात; शिवसेनेचे आणखी ९ आमदार सुरतसाठी रवाना

दि.२जून २०२२ (चेकमेट टाईम्स)एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला आहे एकनाथ शिंदे यांच्यासह १२ ते १५ आमदार नॉट रिचेबत असून ते गुजरातमध्ये असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना या आमदारांशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात असताना आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे आणखी नऊ आमदार गुजरातता रवाना झाले असून अगदी काही वेळातच ते सूरतमध्ये पोहचणार असल्याची सूत्राची माहिती आहे.

एकनाथ शिंदे नॉटरिचेबत असल्याने शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. शिंदे यांच्यासह १३ आमदार बंड करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षातील नाराज आमदारांसह एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये गेले असून तिथे गुजरात सरकारच्या सुरक्षेखाली हॉटेल मेरिडियनमध्ये मुक्कामी आहेत या गायब आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सातत्याने पक्षाकडून होत आहे. मात्र त्यात अद्याप यश आले नसून शिवसेनेची चिता वाढवणारी आणखी एक माहिती समोर येत आहे. शिवेसेनेचे आणखी नऊ आमदार बंडखोरीच्या तयारीत असून ते एकनाथ शिंदे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचत आहेत रस्ते मार्गाने हे आमदार सूरतमधीत हॉटेलमध्ये पोहोचत असल्याचं समोर आलं आहे. आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, पातघरचे आमदार श्रीनिवास वनगा, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, मुंबईतील प्रकाश सुर्वे, तानाजी सावंत हे आमदार गायब असल्याच समोर आले आहे.

विधानपरिषद निवडणुकांचे मतदान पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री १२.३० वाजता वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक घेतली होती. मात्र या बैठकीसाठी शिवसेनेचे १३ आमदार गैरहजर होते पक्षाकडून या आमदारांना वारंवार संपर्क करण्यात येत होता त्यानंतर आज सकाळी पुन्हा आमदारांना बोलावणं धाडलं आहे. या बैठकौला तरी आमदार उपस्थित राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असण्याने शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असल्याची चर्चा सुरू आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.