दि.२4 जून २०२२ (चेकमेट टाईम्स ): गेल्या तीन दिवसांपासून गुवाहटीत ठाण मांडून बसलेले एकनाथ शिंदे गुवाहटीतून बाहेर पडल्याची माहिती काही मिनिटांपूर्वी पुढे आली. एकनाथ शिंदे गुवाहटीतील ज्या हॉटेल रेडिसन ब्लू येथे मुक्कामी आहेत, तेथून एक इनोव्हा कार बाहेर आली. या गाडीतून नेमकं कोण हॉटेलच्या बाहेर गेलं, याची माहिती अद्याप समोर आली नाही. शिंदे आणि त्यांच्या गटातील बंडखोर आमदार येथे वास्तव्यास आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आसाममधील गुवाहटीत मोठ्या घडामोडी घडत आहेत.हॉटेल रेडिसन ब्लू येथील परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हॉटेलमध्ये जाण्यास कुणालाही परवानगी नाही. त्यामुळे प्रवेशद्वारातून आत जाणारे आणि तेथून बाहेर येणाऱ्या व्यक्तींवरून अंदाज काढला जातोय. हॉटेलमधून नुकतीच एक इनोव्हा कार बाहेर आली. त्यात एकनाथ शिंदे असल्याची चर्चा आधी झाली. मात्र एकनाथ शिंदे गटाकडून ही माहिती फेटाळली गेली. एकनाथ शिंदे हॉटेलमध्येच असल्याची माहिती आमदारांनी दिली.
मागील तीन दिवसांपासून एकनाथ शिंदे गटात फक्त आमदारांचं इनकमिंग सुरु आहे. गुवाहटीतून दुसरीकडे एकही आमदार गेला नाही. किंवा शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे सरकारकडे निरोप घेऊनदेखील कुणीही गेलं नाही. मग नुकतीच हॉटेलमधून बाहेर पडलेल्या कारमधून नेमकं कोण गेलं? याबद्दल आता चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे ही कार एअरपोर्टच्या दिशेने गेली. दरम्यान, आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्य़क्ष भुपेन कुमार बोराह यांनी एकनाथ शिंदे यांना लवकरात लवकर गुवाहटी सोडा, असा इशारा दिला आहे. संवैधानिक मूल्ये आणि निष्ठा यांचा अजिबात आदर नसलेल्या आमदारांसाठी गुवाहटी हे योग्य नाही. तुमच्या उपस्थितीमुळे आसामची बदनामी झाली आहे. आसामच्या भल्यासाठी लवकरात लवकर आसाम सोडावे, असा इशारा बोराह यांनी पत्राद्वारे दिला आहे.
दरम्यान, गुवाहटीतील हॉटेल
रेडिसन ब्लू येथे एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांची महत्त्वाची बैठक सुरु आहे.
शिवसेनेनं बंडखोर आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे. मात्र ही
नोटीस कायदेशीर रित्या अवैध असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. असा नोटीशींना आम्ही
घाबरणार नाहीत, असाही इशारा त्यांनी दिला आहे. महाराष्ट्र
सरकारमध्ये सत्तास्थापनेसंदर्भात आणि पक्षावर दावा करण्यासंदर्भात पुढील रणनीती
काय आखायची यासंदर्भात आमदारांच्या या बैठकीत चर्चा सुरु असल्याची माहिती
सूत्रांनी दिली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो
करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes