दि.२५ जून २०२२ (चेकमेट
टाईम्स ): आगामी महापालिका
निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये टिंगरेनगर- संजय पार्क या
प्रभाग क्र. 2 मध्ये थेट शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक गावातील सव्वाशे मतदारांची
नावे आली आहेत. त्याचप्रमाणे केळेवाडी इंदिरा
पार्क हौसिंग सोसायटी मधील मंगेश
वाघमारे या युवकाचे नाव जयभवानीनगर– केळेवाडी
प्रभाग क्रं. ३० मधील मतदार यादीत दिसायला हवे होते. परंतु ते प्रभाग क्रं. १६
फर्ग्युसन विद्यालय - एरंडवणा येथील इंदिरा नगर हौसिंग सोसायटी एरंडवणा या यादीत आले
आहे.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुक प्रारुप यादी जाहीर करण्यात आली आहे. परंतु या यादीत मोठा गोंधळ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संपूर्ण दुरुस्ती करुनच मतदार यादी सुचना व हरकतीसाठी प्रसिध्द करावी अशी मागणी करण्यात येत आहे. पुणे महापालिकेची प्रभाग रचना करताना चुकीच्या तोडफोड केल्याचे समोर आले होते. आता प्रारूप प्रभाग रचना करतानाही एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात टाकणे, काही याद्या गायब होणे असे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. धायरी आंबेगाव प्रभाग क्रमांक ५४ मध्ये तर तब्बल १ लाखापेक्षा जास्त मतदारांचा प्रभाग झाल्याने इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. या मतदार याद्या दुरुस्त केल्या नाहीत तर याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा इच्छुकांनी दिला आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. त्यावर १ जुलैपर्यंत हरकती सूचना नोंदविता येणार आहेत. प्रभाग रचना अंतिम झाली तरी ल्याने राजकीय पक्ष, इच्छुकांकडून प्रभागाचा अभ्यास सुरू आहे. ज्या ठिकाणी हक्काचे मतदान आहे त्यासह अवघड भाग कोणता तेथे लक्ष घालत आहेत.
पण प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर
अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिरूर मतदारसंघातील व पुणे महापालिकेच्या
हद्दीबाहेरील वढू या गावातील १२५ पेक्षा जास्त मतदारांचा समावेश प्रभाग क्रमांक
दोनमध्ये करण्यात आला आहे. अनेक प्रभागाच्या सीमेवरील मतदारांची विभागणी
होण्याऐवजी प्रभागाच्या मध्य भागात असलेले मतदार दुसऱ्या प्रभागात टाकले आहेत.
प्रभाग क्रमांक ३६ कर्वेनगर येथील सोसायट्यांमधील मतदार प्रभाग क्रमांक १६
फर्ग्युसन महाविद्यालय- एरंडवणे येथे जोडले आहेत. प्रभाग क्रमांक शनिवार पेठे-नवी
पेठेतील काही मतदार प्रभाग क्रमांक ५२ सनसिटी-नांदेड सिटीमध्ये टाकले आहेत. एका
मतदारयादीत १ हजार ते १२०० मतदार असतात. काही प्रभागात चार ते पाच तर काही
प्रभागात १० ते १५ मतदारयाद्या दुसऱ्या प्रभागात केले आहेत. अशा प्रकारे बहुतांश
सर्वच प्रभागातील याद्यांमध्ये घोळ झाला आहे. प्रभाग रचनेत आपल्या सोईचा प्रभाग
झाला असे वाटणाऱ्या इच्छुकांचे हक्काचे मतदार गायब झाल्याने त्यांचे धाबे दणाणले
आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो
करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84