पुणे, दि.१६ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): धायरी रायकर
मळा, सर्व्हे. न.७६ येथील सुमारे ५० हजार चौरस फुटांच्या अनधिकृत
बांधकामावर पुणे महानगपालिकेच्या वतीने आज कारवाई करण्यात आली. या परिसरात प्रथमच जॉ
कटरच्या साहाय्याने ६ मजली ४ इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. यावेळी नागरिकांनी व
संबंधीत बांधकाम व्यावसायिकांनी तीव्र विरोध
केला. परंतु या विरोधाला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी न जुमानता ही कारवाई केली.
पुणे महानगरपालिका शहर
अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक
अभियंता युवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, बांधकाम विभाग झोन क्र.२ च्या वतीने
कार्यकारी अभियंता राहुल साळुंके यांच्या नियंत्रणाखाली उप-अभियंता राहुल तिखे,
इमारत निरीक्षक संदेश पाटील, कनिष्ठ अभियंता धनंजय
खोले, निशिकांत छाफेकर, हेमंत कोळेकर,
किरण अहिरराव इत्यादींच्या पथकाने ही कारवाई केली.
यावेळी १ जॉ कटर मशिन, १ जेसीबी व १५ कर्मचारी इत्यादींच्या साहाय्याने,
सिंहगड रोड पोलीस स्टेशन’सह, अतिक्रमण विभागाच्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात
आली. पुणे महानगरपालिकेत समाविष्ट गावांचा विकास आराखडा अजुन तयार व्हायचा आहे. हा
विकास आराखडा तयार करत असताना अनधिकृत बांधकामांमुळे अडथळा येत आहे. तरी नागरिकांनी
कोणतीही अनधिकृत बांधकामे करू नयेत, असे आवाहन कार्यकारी अभियंता राहुल साळुंके यांनी
नागरिकांना केले.
यावेळी सिंहगड पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या
मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे, पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे व वीस पोलीस
कर्मचाऱ्यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर
फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर
चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो
करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
चेकमेट टाईम्समुळे परिसरातील व पुणे शहरातील ताज्या बातम्या व ताज्या घडामोडी दररोज कळतात. त्यामुळे परिसरात काय घडते ते समजते. चेकमेट टाईम्सचा खरोखर अभिमान वाटतो. *श्री सूर्यभान कडलग सर*
उत्तर द्याहटवा