Type Here to Get Search Results !

एकनाथ शिंदे नारायण राणे होतील; शिवसेना नेत्याने आधीच सांगितले होते...

 


दि.२४ जून २०२२ (चेकमेट टाईम्स ): शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. त्यांनी चार अपक्ष आमदारांसह शिवसेनेच्या सुमारे 30 आमदारांना सोबत घेत बंडखोरी करून गुवाहाटीला गेले आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे दिवंगत नेते अनंत तरेंची 2013 ची माध्यमाला दिलेल्या प्रतिक्रियेची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून यामध्ये तरे यांनी एकनाथ शिंदेबाबत केलेली भविष्यवाणी अगदी तंतोतंत खरी ठरली आहे.एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करत आहेत. याबाबत आपण उद्धव ठाकरेंना सांगितले आहे की, शिंदेना आवरा अन्यथा हा दुसरा नारायण राणे होईल, अशी सूचना त्यांनी ठाकरे यांना केली होती. दरम्यान, तरे यांनी केलेल्या त्या वक्तव्याची सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर चर्चा चांगलीच रंगत आहे.

2013 साली तरे यांनी प्रसार माध्यमाला शिंदेविरोधात दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले होते की, एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करत आहेत. याबाबत मी उद्धवजींना सांगितले आहे की, शिंदेना आवरा नाहीतर हा दुसरा नारायण राणे होईल. शिंदे अश्यापद्धतीने काम करतोय की, आपले आपले निवडतोय आणि दुसऱ्यांना बाजूला करत आहे, असे तरे म्हणाले होते. ही क्लिप मुंबईचा शिवसैनिक या ट्विटर आकाउंटवर शेअर करण्यात आली असून शिंदेच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर सोशल माध्यमांवर ही क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे.

आज या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांनी समोर येवून राजीनाम्याची मागणी करा. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही, असे म्हणतं त्यांनी भावनिक आवाहन केले आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान म्हणजे 'वर्षा' बंगला सोडण्याचा निर्णय घेतला असून ते आजच 'मातोश्री' या आपल्या खासगी निवासस्थानी जाणार आहेत. त्याच्या स्वागतासाठी 'मातोश्री'वर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे..दरम्यान, ठाकरे यांनी केलेल्या भावनिक आवाहनानंतरही शिंदे यांच्याकडून आतापर्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसून उलट आघाडी सोबत युती करून घटक पक्षांनाच जास्त फायदा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता या नाराजी नाट्याचे महाविकास आघाडी सरकारवर काय परिणाम होतो. हे बघण औस्तुक्याचे ठरणार आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.