दि.30 जून २०२२ (चेकमेट टाईम्स ): राज्यात
सुरू असलेल्या सत्ता संघर्षामुळे स्थानिक पातळीवर राजकीय पक्षांच्या पदाधिकारी
तसेच कार्यकर्त्यांमध्ये 'फ्लेक्स वॉर' सुरू
आहे. त्यामुळे शहरात वाद-विवाद आणि गोंधळ होण्याची शक्यता असल्याने गेल्या तीन
दिवसांत शहरात तब्बल 5 हजार 482
जाहिरात फलक महापालिकेने काढले आहेत. शहर पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या संयुक्त
बैठकीनंतर ही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या
आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत माने यांनी दिली.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या जवळपास 40 हून अधिक आमदारांनी पक्षाविरोधात बंड पुकारले आहे. त्यामुळे राज्यातील आघाडी सरकार धोक्यात आले आहे. तर, या बंडाचा परिणाम शिवसेनेतील अंतर्गत वाद वाढण्यावर झाला असून, या बंडामागे भाजपचा हात असल्याची राजकीय चर्चा आहे. त्याचे पडसाद राज्यात उमटू लागले असून, आक्रमक झालेल्या शिवसैनिकांकडून पक्षाच्या आमदारांची कार्यालये फोडणे, पोस्टर जाळणे तसेच त्याला काळे फासण्याचे प्रकार सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेत बंड केलेल्या आमदारांचे समर्थनाचे फ्लेक्सही लागत आहेत. अनेक नाराज कार्यकर्ते या फ्लेक्सला काळे फासणे, जाळणे अशाप्रकारे भावना व्यक्त करत आहेत. त्यामुळे, राजकीय वादाचे पर्यवसन हाणामारी मध्ये होत आहे. हे संभाव्य वाद टाळण्यासाठी महापालिका आणि पोलिस यंत्रणेकडून शहरात सर्वत्र जाहिरातीचे बोर्ड, फ्लेक्स, बॅनर्स, पक्षाचे झेंडे काढले जात असल्याचे डॉ. माने यांनी स्पष्ट केले. दरम्यान पोलिसांच्या पाहणीत एकूण 1400 अनधिकृत बॅनर दिसून आले असून त्याबाबत ही उर्वरित फ्लेक्सवर कारवाई करण्यात येत आहे.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

.jpg)