पुणे, दि.६ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): शिवणे उत्तमनगर – “माणसाची बदलत जाणारी दैनंदिन जिवनशैली, बदलते हवामान यामुळे सगळीकडेच आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. वृद्ध असो वा तरूण अनेक लोकांना विविध स्वरुपाच्या व्याधींनी जखडले आहेत. या व्याधींवरील उपचाराला खर्च देखील खूप येतो. जो सामान्य माणसांच्या अवाक्याबाहेरचा असतो. आर्थिक परिस्थिती अभावी अनेक नागरिक उपचार न घेता, शारिरीक पिढा सहन करतात. या सगळ्यांचा विचार करून समाजाला निरोगी आयुष्य लाभावे यासाठी संस्थेच्या वतिने विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबरं घेतली जातात.” असे मत अराईस विश्व सोसायटीचे अशुतोष शिरोळकर यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक
राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिवणे येथील नवभारत हायस्कुल येथे
आरोग्य शिबीर भरविण्यात आले होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि अराईस विश्व
सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकृती हेल्थ केअर प्रकल्पाच्या माध्यमातून
अशा प्रकारची शिबीरे घेतली जातात. या शिबीराचे नियोजन उमेश अण्णा कोकरे युवा मंचाच्या वतीने करण्यात आले होते. या
शिबीराला स्थानिक नागरिकांना उत्तम प्रतिसाद दिला.
टिळक महाराष्ट्र
विद्यापीठाच्या फिजीओथेरपी विभागाच्या प्रमुख डॉ. रिमा मुसळे यांच्यासह विभागातील
डॉक्टर, कर्मचारी,
विद्यार्थी यांच्या १६
जनांच्या टीमने मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मणक्याचे व सांध्याचे आजार,
गुडघेदुखी, संधिवात, सांधेदुखी, अर्धांगवायू आदी
स्वरुपाच्या आजारांवर उपचार केले. वयोमानानुसार होणारे शारीरिक बदल व तक्रारी, गतिमंद, मतिमंद मुलांची शारीरिक तपासणी नागरिकांनी
त्यासंबंधी घ्यावयाच्या काळजी आणि व्यायाम करण्याचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमला...
माजी पं स सदस्य दिलीप कदम, मा सरपंच विजय चांदणे ,प्रा लोयरे मॅडम हर्षल पटवारी ,गणेश राऊत,अमीर सौदागर,मा कांचनताई कदम आदी व
युवा मंच चे मा फरीदा ताई इनामदार,
मा मलिक शेख, मा प्रथमेश गवळी, मा विजय भोसले, मा किरण पाटील, मा रोहित पवळे आदी उपस्थित होते.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला
वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84