पुणे, दि.२० जून २०२२ (चेकमेट टाईम्स): श्री संत जगद्गुरू संत तुकाराम महाराज व
ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा 21 व 22 जून रोजी पिंपरी-चिंचवड शहरातून पंढरीकडे
जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे, वारकर्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी
पालखी मार्गावरील देहू ते पिंपरी चिंचवड पुणे मार्गे सासवडपर्यंत पथारी, हातगाडी, स्टॉलधारक आपला व्यवसाय बंद करून महापालिका व पोलिस प्रशासनाला सहकार्य करणार
आहेत.
महाराष्ट्र हॉकर फेडरेशन व महाराष्ट्र फेरीवाला
क्रांती महासंघाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. कामगार नेते काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, राजू बिराजदार, अनिल बारवकर, फरीद शेख आदीसह पुणे जिल्ह्यातील विक्रेते यावेळी उपस्थित होते. आळंदी व
देहूच्या दिशेने जाणारे व पालखी मार्गातून परत येणार्या भाविकांची गर्दी, अनुचित प्रकार, चेंगराचेंगरी असे प्रकार होऊ नये म्हणून सुमारे पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र
फेरीवाला क्रांती महासंघातर्फे व्यवसाय बंद ठेवून वारकर्यांची सेवा करण्यात येते.
मोफत चहा, नाश्ता, चरण सेवा, अल्पोपहार अशा सेवा फेरीवाल्याकडून करण्यात येत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत
आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84