दि.२४ जून २०२२ (चेकमेट टाईम्स ): रस्त्यावर थांबलेल्या कारच्या काचेवर
दगड मारुन नुकसान करणाऱ्या रिक्षाचालकास जाब विचारणाऱ्या तरुणांना रिक्षाचालकाने
मारहाण केली. त्यानंतर तरुणांच्या मदतीला धावणाऱ्या पोलिसांनाही मद्यपी
रिक्षाचालकाने मारहाण करीत हल्ला केला. या घटनेत एका पोलिस कर्मचाऱ्याच्या
हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, चतुःशृंगी
पोलिसांनी रिक्षा चालकास अटक केली. हि घटना पाषाण येथे बुधवारी मध्यरात्रीच्या
सुमारास घडली. अनिल प्रकाश सदाशिव (वय 32, रा.
निम्हण आळी, पाषाण) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे
नाव आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी दत्तात्रय गेंगजे यांनी चतुःशृंगी पोलिस
ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या सहकाऱ्यासमवेत पाषाण
परिसरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गस्त घालत होते.
त्यावेळी पाषाण येथील रोनिता हॉटेलजवळ अस्लम
अन्सारी व त्यांचे मित्र गणेश थोरात हे दोघेजण त्यांच्या कारजवळ थांबले होते.
त्यावेळी तेथून जाणाऱ्या मद्यपी रिक्षाचालकाने कारच्या मागील बाजुला दगड मारुन
कारचे नुकसान केले. त्यावेळी दोघांनी रिक्षाचालक अनिल सदाशिव यास जाब विचारला.
त्यावेळी त्याने दोघांनाही शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे
दोन्ही तरुणांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. त्यावेळी गस्तीवर असणारे फिर्यादी
गेंगजे व त्यांचे सहकारी त्यांच्या मदतीसाठी धावले. त्यांनी रिक्षाचालकास समजावून
सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षाचालक सदाशिव याने पोलिसांनाही शिवीगाळ करीन
त्यांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न केला. पोलिस त्यास वाहनामध्ये बसवित असताना
त्याने कारचा दरवाजा जोरात ओढला. त्यामध्ये पोलिस अधिकारी बसवराज माळी यांच्या
उजव्या हाताची बोटे दरवाजात आल्याने त्यांच्या बोटांना जबर दुखापत झाली.
रिक्षाचालकाने आरडाओरडा करीत त्यांनाही धमकी दिली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस
निरीक्षक संतोष कोळी करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84