Type Here to Get Search Results !

एकनाथ शिंदे यांच्या बंडावर हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत.

 


दि.२५ जून २०२२ (चेकमेट टाईम्स ): शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकासआघाडी सरकार टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. पण अद्याप त्यांना यश येत नसल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे गुवाहाटी येथे शिवसेनेच्या सर्व बंडखोर शिवसेना आमदारांनी एकमुखाने आपल्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणात भलताच पेच निर्माण झाला आहे. यावर विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे. नुकतंच अभिनेत्री हेमांगी कवी हिने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. हेमांगी कवी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. हेमांगी ही नेहमी विविध राजकीय मुद्द्यांवर तिचे मत व्यक्त करत असते. नुकतंच राज्यातील राजकारणात घडत असलेल्या घडामोडींवर भाष्य केले आहे. हेमांगीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?’, असे हेमांगीने म्हटले आहे.

तिच्या या पोस्टवरुन अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. माणसाला जनावर म्हणलं तर राग येतो आणि वाघ म्हणलं की भारी वाटतं.पण त्यांना कोण सांगणार वाघ सुद्धा जनावरच आहे”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने दिली आहे. तर एका नेटकऱ्याने या महाराष्ट्रात वाघ फक्त दोनच होऊन गेले, छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज, असे म्हटले आहे. तर एकाने बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनाच अशी कमेंट केली आहे. दरम्यान हेमांगी कवीने या पोस्टनंतर तिच्या आगामी चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तमाशा Live’ या चित्रपटातील आहे. येत्या १५ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. हाच खरा हाय वाघ ! असे या गाण्याचे बोल आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.