दि.२५
जून २०२२ (चेकमेट टाईम्स ): नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने
एकीकडे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं चित्र दिसत असून पक्षाच्या अस्तित्वासंदर्भातच
आता राजकीय वर्तुळामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. असं असतानाच दुसरीकडे
मुंबईत मात्र मनसेने शिवसेनेची खिल्ली उडविण्यास सुरुवात केल्याचं चित्र दिसत आहे.
मनसेचे चांदीवली विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी शिवसेनेला बॅनर्सच्या
माध्यमातून डिवचलं आहे. राज ठाकरे आणि अयोध्येमधील राम मंदिराचा फोटो असणारे
बॅनर्स भानुशाली झाली आपल्या विधानसभा क्षेत्रात झळकावले आहेत. या बॅनर्सवर “त्यावेळी माझ्या
राजसाहेबांचे नगरसेवक फोडलेत, आता कसं वाटतंय?” असा प्रश्न विचारला आहे.
मुंबई महानगरपालिकेमध्ये २०१७
साली मनसेचे सात नगरसेवक असताना शिवसेनेने त्यातील सहा नगरसेवकांचा गट फोडला होता.
त्याच राजकीय घडामोडीची आठवण या बॅनर्सच्या माध्यमातून भानुशाली यांनी करुन दिलीय.
याचसंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना भानुशाली यांनी, “मी राजनिष्ठ कार्यकर्ता आहे. मी राजभक्त आहे. म्हणून मला वाटलं की त्यावेळी
जे आम्हाला सातत्याने सांगत होते की सहा नगरसेवक गेलेत तर मनसे संपली. पण तुम्ही
जे पेरणार तेच उगवणार आहे. एकनाथ शिंदे तुमचे ३६ आमदार घेऊन
गेले. म्हणजे सहा गुणीले सहा. याचा अर्थ सहा पट देवाची लाठी तुम्हाला लागलेली आहे,” अशी प्रतिक्रिया दिलीय.
पुढे बोलताना, “काही दिवसांपूर्वी एकच बातमी चालायची की आम्ही खरे हिंदूत्व ते खोटे
हिंदूत्ववादी. पूर्ण भारताने राज ठाकरेंच्या रुपाने कट्टर हिंदूत्ववादी नेता
पाहिला. मात्र आज कशी परिस्थिती झालीय की तुमचेच आमदार सांगतायत तुम्ही हिंदूत्व
सोडल्याने आम्हाला इथं जावं लागलं आहे.
सगळ्यांना माहिती पडलं की खरा हिंदूत्ववादी नेता राज
ठाकरे आहेत,” असंही भानुशाली म्हणालेत.
तसेच भानुशाली यांनी बंडखोर
नेते एकनाथ शिंदे यांनाही एक सल्ला दिलाय. “मी एकनाथ शिंदेंना एवढं सांगणार आहे की, आमदार घ्या पण तपासून
घ्या. नाहीतर असं होणार आमच्याकडून फायदा नाही झाला म्हणून ते शिवसेनेत गेले.
तुमच्याकडे फायदा अधिक होणार म्हणून आता ते तुमच्याकडे येणार. परत उद्धव ठाकरेंनी उद्या काही आमिष दाखवलं तर तिकडे जाणार. म्हणून
तपासून घ्या एवढीच माझी विनंती आहे,” असं भानुशाली यांनी म्हटलंय.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84