Type Here to Get Search Results !

‘मी गुवाहाटीत आहे, कुणाला भेटायचं असेल तर पोहोचा…!’

 


दि.२५ जून २०२२ (चेकमेट टाईम्स ): शिवसेनेचे नेत एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. भारतासोबत पाकिस्तानमध्येही शिंदेंच्या नावाची चर्चा सुरु आहे. शिवसेनेच्या ४० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा एकनाथ शिंदेंना असल्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. या सगळ्याच्या मागे भाजपाचाच हात असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. मात्र, या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये एक वेगळी पण गंमतीशीर बातमी समोर आली आहे. भारताच्या एका प्रसिद्ध उद्योगपतींनी शिंदे प्रकरणावरून एक गंमतीशीर फोटो ट्विट केला आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून अनेक मजेशीर कमेंट्सही आल्या आहेत.

हे ट्विट भारताचे प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी केलं आहे. गोयंका नेहमीच गंमतीशीर ट्विट किंवा किंवा फोटो शेअर करत असतात. ट्विटमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे आणि स्वतःचाच फोटो शेयर केला आहे. हर्ष गोयंका आणि एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यात बरेच साम्य आहे. दाडीची ठेवण, चेहऱ्याचा रंग सगळेच सारखे वाटते. गोयंका यांनी ट्विट करत म्हणले आहे “In Guwahati, if anyone wants to reach me” म्हणजे,”मी गुवाहाटीत आहे, कुणाला भेटायचं असेल तर पोहोचा”. गोयंका यांचे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. या ट्विटखाली लोक गंमतीशीर कमेंट्सही करत आहेत.

हर्षवर्धन गोयंका भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. आरपीजी समुहाचे ते अध्यक्ष आहेत. फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांमध्ये ते ७७ व्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय आहेत. सेंट झेवियर्स कॉलेज, कोलकाता येथून त्यांनी अर्थशास्त्रात विषयात पदवी घेतली तसेच टरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंटमधून त्यांनी आपलं एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.