पुणे, दि.२० जून २०२२ (चेकमेट टाईम्स): योग विद्नान संस्थान दिल्ली, शाखा पुणे व वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वारजे येथील राजमाता जिजाऊ योग साधना केंद्र मध्ये जागतिक योग दिनाचे औचित्य साधून कायमस्वरूपी योग वर्गाचे शुभारंभ करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन विरोधीपक्ष नेत्या सौ.दिपाली प्रदीप धुमाळ व मा नगरसेवक श्री बाबा धुमाळ व मित्र परिवार यांनी केले. याप्रसंगी योग विद्नान संस्थान दिल्ली पुणे शाखेचे प्रमुख श्री शिवप्रकाश मानधनी; श्री दत्तात्रय रेड्डी, श्री राजाभाऊ अभ्यंकर, श्री दिलीप सोमवंशी, उदय हर्डीकर, श्रीधर डुरेपाटील,सौ सुलेखा मानधनी व मीनाताई गावडे यांनी योगा संदर्भात मानवाच्या दैनदिन जीवनामध्ये किती महत्वाचे स्थान आहे याचे महत्व पटवून दिले. योगा मधील प्रत्येक आसने किती महत्वाचे आहे व या आसना मुळे काय काय फायदे होतात व कोणते रोग अथवा शरीराला अपायकारक असणार्या ज्या गोष्टी कशा दुर करायचे यावर शास्त्रोक्त पध्दतीने योग साधकांना योगाद्वारे व प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून पटवून दिले.
आजच्या या
वर्गाच्या शुभारंभ प्रसंगी जवळपास दोनशे योग साधकांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष योग साधना
केली. सदर योग वर्ग रोज सकाळी साडे सहा ते आठ यावेळेत कायमस्वरूपी सुरू राहिल या
योग वर्गात जास्तीतजास्त योग साधकांनी व नागरिकांनी सहभागी होऊन आपले शरीर
तंदुरुस्त व निरोगी , आनंदी राहण्यासाठी रोज योगा करावे असे आवाहन सौ दिपाली धुमाळ यांनी केले. सदर
योग वर्ग यशस्वी होण्यासाठी श्री महादेव गायकवाड सर व सौ मानसी नलावडे व वारजे
हायवे परिसर विकास प्रतिष्ठान च्या सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले. अशी माहिती
श्री प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ यानी दिली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत
आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84