केशव माधव विश्वस्त निधी तर्फे हिंदू साम्राज्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या इचलकरंजी सभागृहात (शिव राज्याभिषेक दिन) हिंदू साम्राज्य दिन मोठया थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाश्वत रुग्णालयाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ हृषिकेश सराफ हे होते.कार्यक्रमास केशव माधव विश्वस्तचे अध्यक्ष नंदाजी भागवत,सचिव अरविंद देशपांडे,हिंदू साम्राज्य दिन कार्यक्रमाचे प्रमुख अनिल वाघ आदि उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण चरित्र आभाळाएवढे मोठे असून हिंदू साम्राज्य दिन म्हणून जो साजरा होतोय त्यात पहिला शब्द हिंदू म्हणू शकलो कारण शिवाजी महाराज होते म्हणून हे लक्षात घ्यायला हवे. आपण शिव राज्यभिषेक दिन साजरा करतो पण आपण त्यांची प्रेरणा घेऊन सामाजिक कार्य करायला पाहिजे. पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण न करता आपण आपली परंपरा व संस्कृतीचा सोडता कामा नये असेही आवाहन चारुदत्त आफळे यांनी यावेळी केले.
संस्थेतर्फ विविध गटातील घेतलेल्या वत्कृत्व,निबंध, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.त्यातील विजेत्यांना पारितोषिके चारुदत्त आफळे यांच्या हस्ते देण्यात आली. गोरक्षक व गोसेवक शिवशंकर स्वामी यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल चारुदत्त आफळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
केशव माधव विश्वस्त निधीचे अध्यक्ष नंदाजी भागवत यांनी चारुदत्त आफळे यांचा सत्कार केला. सचिव अरविंद देशपांडे यांनी डॉ हृषिकेश सराफ यांचा सत्कार केला. शिव प्रेरणा मंत्र बागेश्री जोशी व त्यांच्या समूहाने सादर केला. गारद केदार खत्री यांनी सादर केले.रमा शिंदे व त्यांच्या समूहाने यांनी यावेळी पोवाडा सादर करत हिंदू साम्राज्यदिनाची वातावरण निर्मिती केली. प्रास्ताविक गणेश तांबे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ प्रीतम सेलमोकर यांनी केले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84