अमूल्यज्योती या संस्थेमार्फत बासरी तसेच संगीत या विषयी
प्रचार, प्रसार, प्रबोधन, संशोधन आणि सादरीकरण अशा पंचसूत्रीवर ३३ वर्षांपासून कार्य
सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून या संस्थेचे संस्थापक डॉ. पं.केशव गिंडे यांनी या
आधीच सुमारे चार सप्तके एकाच बासरीवर वाजविण्याची क्षमता असलेली 'केशव वेणू ' निर्माण करून "विश्वविक्रम"
नोंदवला आहे.
भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये काही राग हे खर्जातील
स्वरांचा आविष्कार केल्यास राग सौंदर्य व्यवस्थित मांडता येते. काही राग हे
उत्तरांग प्रधान असतात ज्यामध्ये तार
सप्तक, अति तार सप्तकात अधिक
खुलतात. असे शुद्ध तसेच संपूर्ण राग स्वरूप दाखविण्यासाठी ही केशव वेणू संशोधिली
आहे.
डॉ. गिंडे अभियंता असून नावीन्याचा ध्यास असलेले आहे. त्यांच्या या स्वनिर्मित केशव वेणूवर संशोधन करण्याची गरज भासू लागली. या वेणूच्या लांबीची लांब सडक हात व लांब बोटे असलेली फार थोडी माणसे आहेत. चार फूट लांब असलेली केशव वेणू हातात धरणे व वाजविणे अवघड होते. अशी सहज साध्य, हाताच्या व बोटांच्या आवाक्यात यावी अशी ही वेणू निर्माण करता येईल का यावर संशोधन सुरू झाले. डॉ. गिंडे यांच्या पीएचडीच्या प्रबंधानुसार बासरीची लांबी हाताच्या आवाक्यात आणण्यासाठी बासरीच्या बांबूला इंग्रजी यु आकारात वळविल्यास ही बासरी वाजविणे अतिशय सोपे, सोयीस्कर होऊ शकेल असे म्हटले होते. यावर सत्वर कार्यवाही सुरू झाली. या वेणूवर तसेच अनेक बांबूवर प्रयोग करून शेवटी यु आकाराच्या वेणूची निर्माण केली गेली. या वेणूची लांबी अर्ध्यावर आली. आता प्राथमिक शाळेतील एखादा प्रतिभावंत कलावंतही ही चार स्वर सप्तके वादन क्षमता असलेली बासरी अतिशय सहजतेने, वाजवू शकेल. यामुळे ही वेणू जगातील कोणताही बासरीवादक, ही लांब पल्ल्याची म्हणजे सुमारे ४८ स्वर म्हणजे ८८ श्रुती एकाच बासरीवर आपल्या दहा बोटांनी अतिशय सहज वाजवू शकेल. खर्ज सप्तकातील षड्जसाठी एक छोटी कळ लावली आहे. बासरीवादकाने ही कळ छातीला टेकविली की हा घुमारेदार, सौष्ठव प्राप्त षड्ज अतिशय सुरेल वाजेल. विलंबित, मध्य, द्रुतगती, टप्पा ठुमरी, भजन,नाट्यगीत, सिने संगीत, तंत अंग, धृपद, धमार, ठुमरी, टप्पा, ई. अतिशय सुबकपणे मांडता येते.
संशोधनाची उपयुक्तता- खर्ज षड्ज ते मध्य सप्तक पंचम किंवा पंचम
पासून षड्ज, असे मिन्ड,
जमजमा , सुंथ, घसिट, आंदोलने, ही सर्व संगीताची अंगे त्यांच्या अंगभूत सौंदर्याने मोठ्या
सहजतेने ,आत्मविश्वासाने
वाजविता येतील. या वेणूचे " केशव नाम वेणू" असे सार्थ नामकरण करण्यात
आले. ही वेणू म्हणजे केशव वेणूचा नवा
अवतार आहे. बासरीमधील केशव वेणू प्रमाणेच
माधव वेणू ही खर्ज सप्तकाची बासरी म्हणजे केशव वेणूच्या खर्ज सप्तक पंचमाशी जुळणारी व त्याखालील खरज
अति खर्ज सप्तक वाजणारी आधीच संशोधिली होती,
त्यावरही संशोधन करून इंग्रजी यु आकार देऊन सर्वांना सहज साध्य होईल अशाप्रकरे
तयार केली आहे.
या दोनही वेणूचा आराखडा कागदावर लिहून अगदी तंतोतंत अशी
बासरी निर्माण करण्याची तांत्रिक बाजू नादवेणू फ्ल्युट्स चे संस्थापक डॉ. राजू
साळवे या कल्पक, बुद्धिमान
शिष्य व बासरी निर्माता यांनी चोख सांभाळली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84