Type Here to Get Search Results !

जळगावच्या ललिता जाधव 'कोण होणार करोडपती' च्या मंचावर मांडणार शेतकर्‍यांच्या कुटुंबाची व्यथा!

 


पुणेदि.२० जून २०२२ (चेकमेट टाईम्स): भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो.शेतकरी संपूर्ण देशाला अन्न देतो पण त्याच्या घरचं ताट पंचपक्क्वनाने कधी भरत नाही.कर्जाच्या जाळ्यात अडकलेला शेतकरी शेवटी आत्महत्या करतो आणि स्वतःच्या आयुष्याचा शेवट करतो परंतु त्या शेतकऱ्याच्या मागे त्याच्या कुटुंबाचे हाल होत असतात. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं कुटुंब आपला उदरनिर्वाह करत असतो. स्वतःच्या पतीने आत्महत्या केली असल्याने 'कोण होणार करोडपती' या मंचावरून जळगावच्या ललिता जाधव सगळ्यांना सांगू इच्छितात की, 'आत्महत्या हा मार्ग नाही तर ती अजून एक मोठी अडचण आहे'. मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी ललिता 'कोण होणार करोडपती' या खेळात सहभागी झाल्या आहेत.

जळगावच्या ललिता जाधव 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत कारण त्यांना  मुलांच्या शिक्षणासाठी पैसे साठवायचे आहेत. ललिता या अंगणवाडी शिक्षिका आहेत. या आधी त्या सेविका म्हणून काम करत. पण त्यांना स्वतःची प्रगती करायची होती. म्हणून त्यांनी लग्नानंतर अजून शिक्षण घ्यायचे ठरवले. परंतु घरची परिस्थिती बेताची असल्याने कधी ओवाळणीतून किंवा अजून कुठून जर पैसे भेट म्हणून मिळाले तर ते पैसे त्या जपून ठेवत आणि लागतील तसे ते पैसे शिक्षणासाठी वापरत. असे करून त्यांनी एम.ए.केले आणि त्या शिक्षिका झाल्या.ललिता यांचे लग्न एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात झाले. त्यामुळे सासरी देखील पैशाची अडचण कायम असायची. कधी हवामान साथ देत नाही तर कधी पिकाला हवा तो भाव मिळत नाही. म्हणून कायम हातात जेमतेम पैसा असे. या सगळ्या मुळे कर्ज घेण्याची वेळ आली पण आता ते कर्ज फेडणार कसे. फेडण्याचा काही मार्ग दिसला नाही म्हणून ललिता यांच्या पतीने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली आणि ललिता आणि मुलांना सोडून निघून गेले. त्यानंतरचा खडतर प्रवास ललिता यांनी एकटीने केला. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात येऊन त्या त्यांच्या मुलांचं भविष्य सुधारू इच्छितात त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा त्यांचा उद्देश आहे. पाहायला विसरु नका 'कोण होणार करोडपती' आज रात्री 9 वाजता. आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.