दि.२१ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): राज्य विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी सोमवार दि. 20 जून 2022 रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. उमेदवारांना जिंकण्यासाठीचा 2600 हा मतमूल्यांचा कोटा पूर्ण करण्यासाठी फेरीनिहाय मिळालेले मतमूल्य पुढीलप्रमाणे :
पहिल्या फेरीअखेर
राम शिंदे (भाजपा) यांना 3000, श्रीकांत भारतीय (भाजपा) यांना 3000, एकनाथ खडसे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना 2900, प्रवीण दरेकर (भाजपा)
यांना 2900, रामराजे नाईक निंबाळकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
यांना 2700, श्रीमती उमा खापरे (भाजपा) यांना 2700, सचिन अहिर
(शिवसेना) यांना 2600 आणि आमश्या पाडवी (शिवसेना) यांना 2600 तर पाचव्या फेरीअखेर
प्रसाद लाड (भाजपा) यांना 2857 इतके मतमूल्य मिळून त्यांनी विजयासाठीचा कोटा पूर्ण
केला.
दहाव्या व
शेवटच्या फेरीअखेर भाई जगताप (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांना 2474 इतकी मतमूल्य
तर चंद्रकांत हंडोरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांना 2200 इतकी मतमूल्य मिळाली.
या फेरीअखेर अधिक मतमूल्यांच्या आधारे श्री.जगताप हे विजयी झाल्याचे निवडणूक
निर्णय अधिकारी श्री.राजेंद्र भागवत यांनी जाहीर केले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes