दि.२२ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे
प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला नंतर, राज्यात अनेक राजकीय
हालचालींनी वेग धरला आहे. महाविकास आघाडी सरकार केव्हाही कोसळेल अशी अवस्था असताना
भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण आहे. ठाकरे सरकार
कोसळल्यास देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येणार अशी खात्रीच भाजपच्या समर्थकांमध्ये
पाहायला मिळते. मोठ्या संख्येने विजयी होऊन सुद्धा सत्ते पासून वंचित राहिलेल्या
भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी हा एक आशेचा किरण असून देवेंद्र फडणवीस हे राज्यसभा
आणि विधानपरिषदेप्रमाणे येथे ही गेम चेंजर ठरतील अशी खात्री पाहायला मिळते.
आज
पुणे शहर परिसरात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या
पालख्यांचे आगमन होत आहे. भाजपाच्या उत्साही पदाधिकाऱ्यांकडून पालखी मार्गावर फलक
लावण्यात आले आहेत ज्यामध्ये साक्षात पांडुरंगाला ” हे माउली तुझी कृपा सदैव
राहू दे, तुझ्या
पंढरपूरच्या पूजेला मुख्यमंत्री म्हणून देवेन्द्रजी येऊ दे..! असे साकडे घालण्यात
आले आहे. भारतीय जनता पार्टी शिवाजी नगर मतदारसंघाचे अध्यक्ष रवींद्र साळेगावकर
यांच्या कडून प्रभाग क्रमांक १० येथील पाटील इस्टेट परिसरात पालखीमार्गात हे फलक
लावण्यात आले आहे.
याबाबत
सांगतांना साळेगावकर म्हणाले कि ” देवेंद्रजीच
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील यासाठीच जनतेने कौल दिला होता पण तसे झाले नाही
आणि आज पुन्हा ती वेळ आहे. देवेंद्रजीचं आमच्या मनातले मुख्यमंत्री होते आणि
येत्या आषाढी एकादशीला पांडुरंगाची पूजा त्यांच्याच हातून घडावी हि आम्हा सर्व
भाजप पदाधिकाऱ्यांची भावना आहे आणि त्यासाठीच आम्ही पांडुरंगाला साकडे घातले आहे.
आमची हि इच्छा लवकरच पूर्ण होईल हि खात्री आणि विश्वास असल्याचेही ते म्हणाले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84